‘महानायक’ अमिताभ बच्चन यांचा ‘कोरोना’ रिपोर्ट आला निगेटिव्ह, ‘बिग बीं’ना डिस्चार्ज पण अभिषेक हॉस्पीटलमध्येच राहणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महानायक अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. बिग बी यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून ते लवकरच घरी पोहचतील. मुलगा अभिषेक बच्चन यानं ट्विट करून सोशल मिडीयावर याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, अभिषेक बच्चनला आणखी काही दिवस हॉस्पीटलमध्येच राहवं लागणार आहे. त्याबाबत स्वतः अभिषेकनं ट्विट करून सांगितलं आहे. त्याची कोरोनाची टेस्ट अद्याप निगेटिव्ह आलेली नाही. त्याबाबत त्यांन सविस्तरपणे ट्विटमधून सांगितलं आहे.

बिग बी अमिताभ आणि त्यांचा मुलगा अभिषेक यांना कोरोनाची लागण झाल्यामुळं त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, त्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन हिची देखील कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर तिला देखील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. काही दिवसांच्या उपचारानंतर पुन्हा ऐश्वर्याची टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये तिचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर तिला आणि मुलगी आराध्या यांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोनाची चाचणी झाली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याबाबत मुलगा अभिषेक बच्चन यांनी ट्विट करून सांगितलं आहे.

दरम्यान, अभिषेक बच्चनला आणखी काही दिवस हॉस्पीटलमध्येच राहवं लागणार आहे. त्याबाबत स्वतः अभिषेकनं ट्विट करून सांगितलं आहे. त्याची कोरोनाची टेस्ट अद्याप निगेटिव्ह आलेली नाही. त्याबाबत त्यांन सविस्तरपणे ट्विटमधून सांगितलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like