‘स्टायलिश’ चष्म्यांवरून ‘बिग बी’ अमिताभ यांनी काढला ‘चिमटा’, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार बिग बी अमिताभ बच्चन या ना त्या कारणानं सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांच्या सोशलवरील पोस्ट चाहत्यांनाही खूप आवडतात. अशाच एका मजेदार पोस्टमुळं ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी स्टाईलिश चष्मा वापरल्यानंतर कसं वय लपून राहतं हे सांगितलं आहे.

https://www.instagram.com/p/B87Ka21hLT5/?utm_source=ig_embed

अमिताभ बच्चन यांनी त्यांचेच दोन फोटो शेअर केले आहेत. फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये बि बी म्हणतात, “अरे यार ही चष्म्याची फॅशन कोणी काढली आहे. ज्यानं बनवली असेल एकदम सही बनवली आहे. डोळ्यांच्या चहु बाजूंना जी गडबड झाली आहे ना म्हणजेच डोळ्यांच्या आसपास एज डिफेक्टेड झालं आहे ना… ते हाईड होत आहे.” बिग बींना म्हणायचं आहे की, चष्मा फक्त स्टाईलसाठी नाही तर डोळ्यांच्या जवळपास असणाऱ्या सुरकुत्या लवपण्याचं काम करतो. बिग बी देखील काही कमी फॅशनेबल नाहीयेत. अनेक सिनेमात ते वेगवेगळ्या अंदाजात दिसत असतात.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर अलीकडेच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.