मृत म्हणून डॉक्टरांनी ‘डस्टबीन’मध्ये फेकलं, कहाणी ऐकून अमिताभ बच्चनही ‘स्तब्ध’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कौन बनेगा करोडपतीच्या सिझन ११ मध्ये गुरुवारी कंटेस्टंन नुपूर चौहान हॉट सीट वर पोहचली आणि केबीसीच्या मंचावर एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. अमिताभ बच्चन स्वतः नुपूर यांना आणण्यासाठी त्यांच्या जागेपर्यंत गेले.

डॉक्टरों ने मरा समझकर डस्टबिन में फेंका, इनकी कहानी पर अमिताभ भी स्तब्ध

नुपूर चौहान यांना एक आजार आहे ज्यामुळे त्या नीट चालू शकत नाहीत. मात्र कधीही व्हील चेअरचा वापर न करण्याचा निर्णय नुपूर यांनी घेतलेला आहे. मग स्टॅन्ड घेऊन का चालावे लागेना. नुपूर यांची हॉट सीट वर वर्णी लागताच अमिताभ बच्चन हे स्तब्ध झाले कारण नुपूर यांनी आपल्या आयुष्यातील काही थरारक अनुभव या मंचाच्या माध्यमातून सांगितले.

डॉक्टरों ने मरा समझकर डस्टबिन में फेंका, इनकी कहानी पर अमिताभ भी स्तब्ध

अमिताभ यांनी फास्ट फिंगरचा निकाल जाहीर करताच नुपूर मोठं मोठ्याने रडू लागली हे पाहूनच अमिताभ बच्चन तिच्या शेजारी आले. नुपूर शांत झाल्यावर तिच्या भावाने येऊन तिला उचलले आणि हॉटसीट वर बसवले यामुळे संपूर्ण मंचाने यावेळी टाळ्यांचा कडकडाट केला.

डॉक्टरों ने मरा समझकर डस्टबिन में फेंका, इनकी कहानी पर अमिताभ भी स्तब्ध

या वेळी करोडपतीच्या प्रश्नाआधी अमिताभ यांनी नुपूर यांच्या अशा परिस्थितीचे कारण विचारले तेव्हा नुपूरने सांगितले की, त्या Mixed Cerebral Palsy आजाराने ग्रासलेल्या आहेत. या आजरामध्ये व्यक्तीच्या शरीराचा एक भाग निकामी होतो किंवा ती व्यक्ती इतर माणसांच्या तुलनेने खूपं लहान राहते. नुपूरने सांगितले की सुदैवाने त्यांचे पाय काम करत नाहीत मात्र मेंदू पूर्णतः काम करतो.

नुपूर ने सांगितले की तिचा ज्यावेळी जन्म झाला होता त्यावेळी ती रडत नाही हे पाहून डॉक्टरांना ती जिवंत नसल्याचे वाटले त्यामुळे डॉक्टरांनी तिला मृत समजून डस्टबिनमध्ये टाकले. मात्र नूपुरच्या आजी आणि मावशीने एका कर्मचाऱ्याला पैसे देऊन तिच्या पाठीवर मारायला सांगितले. तसे करताच नुपूर रडू लागली ऑक्सिजनची कमी असल्यामुळे त्यावेळी नुपूर रडू शकली नाही. नंतर मात्र १२ तास नुपूर रडली. त्यावेळी नुपूरला ट‍िटनेस आणि ज्वाइंडिसचा आजार आहे समजून चुकीचे इंजेक्शन दिले गेले. नुपूरने सांगितले की डॉक्टरांच्या चुकीमुळे केस इतकी बिघडली की मी बाकी मुलांप्रमाणे नॉर्मल नाही राहू शकले.

डॉक्टरों ने मरा समझकर डस्टबिन में फेंका, इनकी कहानी पर अमिताभ भी स्तब्ध

यावर अमिताभ बच्चन यांनी डॉक्टरांच्या या कृत्याबद्दल हा एक अपराध असल्याचे म्हंटले तर नुपूर यांची ही परिस्थिती ऐकल्यावर मी तुम्हाला काय म्हणू मी एकदम स्तब्ध आहे असं बच्चन यावेळी म्हणाले. तर अमिताभ यांनी यावेळी नूपुरच्या धाडसाचे कौतुकही केले. नुपूर पुढील भागात २५ लाखांच्या प्रश्नासाठी खेळणार आहे. तर पुढील भागात सिंधुताई सपकाळ या सुद्धा उपस्थित असणार आहेत.

डॉक्टरों ने मरा समझकर डस्टबिन में फेंका, इनकी कहानी पर अमिताभ भी स्तब्ध

आरोग्यविषयक वृत्त –