Big B अमिताभनं ‘थ्रोबॅक’ फोटो शेअर करत चाहत्यांना दिलं ‘हे’ चॅलेंज !

पोलिसनामा ऑनलाइन –बिग बी अमिताभ बच्चन यांनी एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे ज्यात ते अनेक दिग्गज कलाकारांसोबत दिसत आहेत. सोबतच त्यांनी त्यांच्या चाहत्यांना असं चॅलेंज केलं आहे की, त्यांनी स्टार्स ओळखून दाखवावेत.

या फोटोत बिग बींसोबत बॉलिवूड आणि बंगाली सिनेमातील मोठी नावं आहेत. हा फोटो कोलकात्याच्या ई़डन गार्डन स्टेडियअमधील एका मॅच दरम्यानचा आहे. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं की, “प्रतिदिन या कठिण परिस्थितींबद्दल गप्पा व्हायच्या. खूप विचार केला की काही जुन्या आठवणींना उजाळा द्यावा. घरीच बसून.” या ट्विटच्या शेवटी त्यांनी चाहत्यांना चॅलेंज दिलं की, फोटोत कोण कोण आहे हे त्यांनी ओळखून दाखवावं.

फोटोबद्दल सांगायचं झालं तर या फोटोत अमिताभ बच्चन यांच्या व्यतिरीक्त जितेंद्र, दिलीप कुमार, अनिल चोपडा, जॉनी वॉकर, अनिल चॅटर्जी, रबी घोष आणि प्रेम चोपडा आदी लोक आहेत.

चाहत्यांनीही शेअर केले बिगी बींचे शानदार थ्रोबॅक फोटो

बिग बींच्या या फोटोवर लगेचच चाहत्यांच्याही रिअॅक्शन येताना दिसल्या. एकानं एक फोटो शेअर केला ज्यात बिग बींच्या हातात बॅट दिसत आहे. त्यानं फोटो शेअर करत लिहिलं की, हा 1979 चा फोटो आहे ना. आणखी एकानं विनोद खन्न यांचा फोटो शेअर करत लिहिलं की, हा एकच वेळचा फोटो आहे ना. आणखी एकानं बॅटींग करणाऱ्या अमिताभ यांचा फोटो शेअर केला आहे.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, गुलाबो सिताबो अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर अलीकडेच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.