ट्विटरवरही अमिताभच शहनशाह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

शतकाचा महानायक अमिताभ बच्चन बॉलीवूडच्या अनेक नामवंत कलाकारांपेक्षा अनेक बाबतीत आजवर वरचढ ठरले आहेत. आता ट्विटरवरही त्यांनी इतर अभिनेत्यांवर मात केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’589175e0-cb75-11e8-9123-338446985a5d’]

महानायक अमिताभ बच्चन, २०१७ -१८ मध्ये ट्विटरवर सर्वाधिक चर्चेत असलेले लोकप्रिय आणि ट्रेंडिग बॉलीवूड स्टार बनलेत. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, सप्टेंबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ मध्ये बाकी बॉलीवूड ताऱ्यांपेक्षा शहनशाह अमिताभ बच्चन ह्यांचीच लोकप्रियता जास्त दिसून आलीय.

‘त्या’ घटनेनंतर, खिलाडी अक्षय कुमारची सायबर पोलिसात धाव

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या वार्षिक चार्टच्यानुसार, गेल्या ५२ आठवड्यांमध्ये ट्विटरवर लोकप्रियतेत अमिताभ बच्चन पहिल्या स्थानी तर, किंग खान शाहरूख दुसऱ्या क्रमांकावर, सलमान खान तिसऱ्या, अक्षय कुमार चौथ्या आणि ऋतिक रोशन लोकप्रियतेत पाचव्या पदावर होते. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल यांनी सांगितले की, ट्विटरवर महानायक अमिताभ बच्चन यांना मोठा चाहता वर्ग लाभला आहे. एवढी लोकप्रियता इतर कोणत्याही भारतीय अभिनेत्याला मिळालेली नाही. बिग बी खरोखरच फक्त अभिनयातच नाही तर लोकप्रियतेतही बाकी अभिनेत्यांपेक्षा सवाई आहेत.

[amazon_link asins=’B00HWP8Q8Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ef35741b-cb75-11e8-9796-975ba645529e’]

अश्वनी कौल म्हणाल्या, १४ भारतीय भाषांमधल्या ५००हून अधिक न्यूज वेबसाइटमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटीच्याविषयी लिहिलेल्या बातम्यांच्या अनूसार तारे-तारकांची लोकप्रियता समजते. गेल्या काही दिवसांमध्ये डिजिटल दुनियेत अनुष्काच्या मुलाखती, व्हिडिओ, आर्टिकल आणि न्यूजच सर्वाधिक दिसत होत्या.