3G, 4G, 5G आणि ‘बिग बी’ अमिताभ यांचं ट्विट, हसू आवरणार नाही तुम्हाला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे ट्विटरवर खूपच अ‍ॅक्टिव्ह असतात. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवरून अमिताभ बच्चन अनेकदा आपल्या ट्विटरवरून व्यक्त होत असतात. कधी ते देश स्वछतेसाठी ट्विट करतात तर कधी आरे मध्ये होणाऱ्या प्रकल्पासाठी. नुकतेच बच्चन यांनी केलेल्या एका ट्विटला ट्विटरवर चाहत्यांचा खूप प्रतिसाद मिळत आहे.

इंटरनेटच्या 3 जी, 4 जी, 5 जी पॅक्सवर अमिताभ यांनी एक जोक शेअर केला आहे. ‘हमारे बचपन में 3 जी, 4 जी, 5 जी नहीं होते थे. सिर्फ गुरु जी और पिता जी, माता जी होते थे. एक ही थप्पड में नेटवर्क आ जाता था’ असा हा जोक आहे.

अमिताभ यांनी शेअर केलेला हा जोक लोकांना इतका आवडला की आत्तापर्यंत 6 हजारांवर लोकांनी तो री-ट्विट केला आहे. तर साठ हजारांपेक्षा जास्त लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे. या आधी अमिताभ यांनी केलेल्या आरे मधील मेट्रो बाबतच्या ट्विटमुळे मुंबईकर काहीसे त्यांच्यावर नाराज देखील झाले होते.

आरे बाबतच्या ट्विट मध्ये अमिताभ यांनी आपल्या मित्रांसोबत घडलेली एक घटना सांगत मेट्रोचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. मेडिकल इमर्जन्सीवेळी मित्राने त्याच्या कारऐवजी मेट्रो सेवेचा पर्याय निवडला. मेट्रो सुविधा सोयीस्कर असल्याचे त्याने परतल्यानंतर सांगितले. खासगी वाहनापेक्षा मेट्रो सुविधा अधिक कार्यक्षम असल्याचे मित्राने सांगितले. मात्र यानंतर अनेक मुंबईकरांनी त्यांच्या या वक्तव्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती.

Visit : policenama.com