‘Big B’ अमिताभनं केलं ट्विट, म्हणाले – ‘लोग पीकर खाली कर देते अगर समंदर खारा ना होता’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अमिताभ आपल्या ट्विटर आणि इंस्टावरून नेहमीच काही ना काही पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या पोस्ट कायमच सोशलवर चर्चेत असतात. पुन्हा एकदा असंच काहीसं झालं आहे. अलीकडेच त्यांनी केलेलं ट्विट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “मिजाज में थोडी सख्ती जरूरी है जनाब, लोग पीकर खाली कर देते अगर समंदर खारा नहीं होता.”

बिग बींचं हे ट्विट चाहत्यांनाही खूप आवडलं आहे. सध्या त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 2 लाखांहून अधिक लोकांनी त्यांचं हे ट्विट लाईक केलं आहे. अनेक चाहते कमेंट करत आपल्या भावना मांडताना दिसत आहेत. एकानं म्हटलं आहे की, खूप सुंदर लाईन्स आहेत. तुम्ही सदाबहार आहात. एकानं म्हटलं की, काय शायरी आहे. मन खुश केलं तुम्ही तर.”

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, गुलाबो सिताबो अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर अलीकडेच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like