नेपाळ मधील सिनेमाच्या या ‘अमिताभ बच्चन’ने २२ वर्षापेक्षा लहान मॉडलशी केलं होतं लग्‍न !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नेपाळी सिनेमात अमिताभ बच्चनच्या रुपात प्रसिद्ध अ‍ॅक्टर राजेश हमल भारतीयांसाठी खूप ज्ञात असं नाव नाही. परंतु राजेश नेपाळचे असे अ‍ॅक्टर आहेत ज्यांना तेथील महानायक म्हटलं जातं. ५५ वर्षीय राजेश यांचे स्थान नेपाळ मध्ये तसेच आहे जसे भारतात अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानसारख्या कलाकरांचे आहे. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन अ‍ॅक्टींगमध्ये बनवलेली स्वतंत्र ओळख ही काही वर्षांचीच मेहनत नाही. या नेपाळच्या महानायकाविषयी अनेक रंजक गोष्टी आहेत.

१९८८ साली आलेल्या युग देखी युग सम्म (युग से युग तक) या सिनेमातून राजेश यांनी सिनेमात डेब्यू केला होता. आपल्या पहिल्याचं सिनेमातून राजेश यांनी प्रेक्षकांवर आपली छाप पाडली. यानंतर राजेश यांनी देउता, बसंती, हामी तीन भाई, गिरफ्तार, कर्मयोद्धा, शकुंतला या सिनेमातून आपला अभिनय सिद्ध केला.

राजेश यांचा शिक्षण ते अ‍ॅक्टींग हा प्रवास सोपा नव्हता. राजेशचे वडिल बहादुर हमल हे राजकीय व्यक्तीमत्त्व होतं (काही रिपोर्ट्सनुसार ते पाकिस्तानात नेपाळी दूतावास होते.) त्यावेळी नेपाळमध्ये अ‍ॅक्टींगला खूप कमी समजलं जायचं. राजेश यांचं घराणंही मोठं होतं. सिनेमात येण्यासाठी त्यांना कुटुंबाकडून खूप विरोध सहन करावा लागला. त्यांच्या वडिलांनी कधीच अ‍ॅक्टींगसाठी परवानगी दिली नव्हती.

राजेश यांनी भारतातील पंजाब युनिव्हर्सिटीतून एमएची पदवी घेतली. त्यांनी मॉस्कोमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्याबद्दल अधिक रंजक गोष्ट ही आहे की, त्यांचं आपल्या केसांवर खूप प्रेम होतं. एका रिपोर्टनुसार, त्यांनी आपल्या वडिलांच्या अंतिम संस्कारावेळी परंपरेला न मानता मुंडन केले नव्हते.

राजेश हमल सध्या बहुचर्चित शो को भंच्छे करोडपती (कौन बनेगा करोडपती) होस्ट करत आहेत. सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर ते शेवटचे २०१६ मध्ये बिजुली मशीनमध्ये दिसले होते.

राजेश हमल यांनी आपल्यापेक्षा २२ वर्ष लहान मॉडेल मधु भट्टरायसोबत लग्नगाठ बांधली. दोघांची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. दोघे २००४ साली लक्स ब्युटी स्टार कार्यक्रमात पहिल्यांदा भेटले होते.


दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर २०१४ साली दोघांनी लग्न केलं. २२ वर्षांचा बिग एज गॅप असूनही दोघे परफेक्ट कपल्सपैकी एक आहेत. जसे भारतात अमिताभ बच्चन लोकांचे सुपरस्टार आहेत तशीच लोकप्रियता राजेश यांची नेपाळमध्ये आहे.

आरोग्यविषयक वृत्त –