Amitabh Bachchan On BMC | कोरोना काळातील मुंबई महापालिकेच्या कामाचे ‘बिग बी’नी केले कौतुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amitabh Bachchan On BMC | कोरोना काळ (Corona) हा सगळ्यांसाठीच खूपच अवघड काळ होता. या कोरोनाच्या काळात प्रत्येक महानगर पालिकेला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत होते. अशाच कोरोनाच्या काळात मुंबईच्या महापालिकेने (Mumbai Muncipal Corporation) उत्तम अशी कामगिरी केल्याचे वक्तव्य अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी करत मुंबई महापालिकेचे गौरव उद्गार केले आहे. (Amitabh Bachchan On BMC)

 

‘मुंबई फाइट्स बॅक’ (Mumbai Fights Back) या पुस्तकाच्या प्रकाशन वेळी ते बोलत होते. हे पुस्तक कोरोना काळात तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या अनुभवावर आधारित आहे. कोविड विषाणूला मुकाबला करणे हे अत्यंत मोठे आवाहन मुंबईसारख्या दाट लोकसंख्या असलेला शहरासाठी होते. दिवस रात्र एकत्र करून मुंबई महापालिकेने केलेल्या कामामुळे कोरोना विरुद्ध लढा देण्यात यश मिळाले. (Amitabh Bachchan On BMC)

‘मुंबई फाइट्स बॅक’ हे पुस्तक केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच नव्हे
तर सामाजिक दृष्ट्या देखील एक महत्त्वाचे दस्तऐवज असल्याचे मत बिग बी यांनी यावेळी व्यक्त केले.
पुस्तकाच्या सहलेखिका सुमित्रा डेबरॉय (Sumitra Debroy) यांनी भविष्यात येणाऱ्या साथरोगविषयक व्यवस्थापन करताना
कोणत्या बाबींची काळजी घ्यावी याचीही रूपरेषा या पुस्तकात आहे असे सांगितले.

 

 

Web Title :- Amitabh Bachchan On BMC | the work of the corona era is incomparable
big b appreciates the work of the mumbai municipal corporation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | उल्टा चोर कोतवाल को डांटे, ई-चलन कारवाई केल्याच्या रागातून रिक्षा चालकाने
वरिष्ठ पोलिसांना दिली गुन्हा दाखल करण्याची धमकी

Solapur Crime | अनैतिक संबंधातून पत्नीने काढला पतीचा काटा ! झोपेच्या गोळ्या, दोरी आणि चाकूचा वापर करून प्रियकराच्या मदतीने केला खून

BJP MLA Nitesh Rane- Devendra Fadnavis | आदित्य सेनेच्या टक्केवारीमुळेच मुंबईकर हद्दपार होतोय, भ्रष्ट बिल्डरांवर कारवाई करा; नितेश राणेंची फडणवीसांकडे मागणी