‘बिग बीं’नी २१०० शेतकऱ्यांचे कर्ज भरले ; पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवारांनाही करणार आर्थिक मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी २१०० शेतकऱ्यांचे कर्ज भरले आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वतः ही बातमी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिले की, मी जे वचन दिले होते ते पूर्ण केले आहे.

बिहारच्या ज्या शेतकऱ्यांवर कर्ज होते, त्या शेतकऱ्यांपैकी २१०० शेतकऱ्यांचे कर्ज भरले आहे. कर्जाची पूर्ण रक्कम ‘वन टाइम सेटलमेंट’ च्या माध्यमातून भरली आहे. यांपैकी काही शेतकऱ्यांना जनक बंगल्यावर बोलावून श्वेता आणि अभिषेक यांच्या हस्ते कर्जाची रक्कम देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना मदतीची ही पहिलीच वेळ नाही

या आधी अमिताभ बच्चन यांनी लिहिले होते की, ज्या शेतकऱ्यांना कर्ज फेडणे शक्य होत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी ही भेट आहे. या वेळेस असे शेतकरी बिहार राज्यातील असतील. अमिताभ बच्चन यांची शेतकऱ्यांना मदत करण्याची ही पहिलीच वेळ नसून गेल्यावर्षी देखील उतरप्रदेशच्या जवळपास १००० शेतकऱ्यांचे कर्ज बच्चन यांनी भरले होते.

पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवारांना आर्थिक मदत

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये हे पण लिहिले आहे की, अजून एक वचन पूर्ण करायचे आहे. पुलवामा हल्ल्यात जे वीर सैनिक देशासाठी शहिद झाले आहेत, त्यांच्या परिवारांना आर्थिक मदत करायची आहे.

लवकरच दिसणार ब्रह्मास्त्र या चित्रपटात

अमिताभ बच्चन सध्या एका चित्रपटात व्यस्त आहेत. अमिताभ बच्चन लवकरच ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसून येतील. या चित्रपटात त्यांच्यासोबत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट दिसणार आहेत.

आरोग्य विषयक वृत्त –

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

Loading...
You might also like