2 दिवसांपूर्वी अमिताभ यांनी शेअर केली होती कविता, म्हणाले – ‘कठीण वेळ टळून जाईल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल केले गेले. सोशल मीडियावर सक्रिय असणारे अमिताभ यांनी स्वत: कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे ट्विट करून चाहत्यांना माहिती दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक वेळी लोकांना कोणत्या ना कोणत्या विषयावर धैर्य देणाऱ्या अमिताभ यांनी दोन दिवसांपूर्वी अशीच एक कविता शेअर केली होती, ज्यात त्यांनी लोकांना या कठीण काळात उभे राहण्याचे प्रोत्साहन दिले होते.

अमिताभ यांनी ही कविता आपल्या आवाजात शेअर केली होती. कविताचे बोल काहीसे असे आहेत – ‘गुजर जाएगा गुजर जाएगा, मुश्क‍िल बहुत है मगर वक्त ही तो है, गुजर जाएगा, जिंदा रहने का ये जो जज्बा है, फिर उभर आएगा, गुजर जाएगा, माना मौत चेहरा बदल कर आई है, माना रात काली है भयावह है, गहराई है, लोग दरवाजों पे, रास्तों पे रुके बैठे हैं, कई घबराए हैं, सहमे हैं, छ‍िपे बैठे हैं, मगर यकीन रख यह बस लम्हा है दो पल में बिखर जाएगा, जिंदा रहने का ये जो जज्बा है फिर असर लाएगा, मुश्क‍िल बहुत है, मगर वक्त ही तो है गुजर जाएगा, गुजर जाएगा.’ या शब्दांद्वारे अमिताभ यांनी लोकांना कोरोना काळाविरूद्ध लढा देण्यासाठी आणि त्याविरुद्ध संयम राखण्यासाठी प्रेरित केले. 8 जुलै रोजी ट्विट करुन त्यांनी ही सुंदर कविता शेअर केली होती.

उल्लेखनीय आहे की शनिवारी रात्री उशिरा अमिताभ आणि अभिषेक बच्चन दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर लवकरच त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रॅपिड टेस्ट नंतर त्यांची दुसरी टेस्ट करण्यात आली, ज्याचा रिपोर्ट 24 तासांच्या आत येईल.

दुसर्‍या टेस्टच्या निकालाची प्रतीक्षा
जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांची कोरोना टेस्टही झाली होती. तिघांचे टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे दिसून आले. त्यांच्या संपूर्ण कर्मचार्‍यांचीही कोरोना टेस्ट घेण्यात आली आहे. सध्या संपूर्ण देश अमिताभ आणि अभिषेक यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करीत आहे.