शस्त्रक्रियेनंतर Big B अमिताभनं दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘मी दृष्टीहीन झालोय…’

बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशलवर कायमच ॲक्टीव्ह असतात. अनेकदा त्यांनी शेअर केलेली पोस्ट सोशलवर चर्चेत आल्याचं दिसतं. ब्लॉग्स लिहितही ते चाहत्यांशी संपर्क साधत असतात. अलीकडेच त्यांनी माहिती दिली होती की, त्यांची प्रकृती बिघडली असून त्यासासाठी एक सर्जरी करावी लागणार आहे. यानंतर चाहतेही चिंतीत झाले होते. आता शस्त्रक्रिया होताच त्यांनी सोशलवरून चाहत्यांशी संवाद साधला आहे. मी दृष्टीहीन झालो आहे पण दिशाहीन नाही असं ते म्हणाले आहेत.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांची अवस्था सांगण्यासाठी वडिल हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेचा आधार घेतला आहे. बिग बींनी त्यांच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये ते लिहितात-

हूँ दृष्टि हीन, पर दिशा हीन नहीं मै,
हूँ सुविधा हीन, असुविधा हीन नहीं मै ।।
सहलाने वालो की, मृदु है संगत,
बहलाने वाले सब, यहाँ सुसज्जित।
स्वस्थ रहने का प्यार मिला,
हृदय प्रफुल्लित आभार खिला,
कुछ क्षण के लिए हँ मै समय बद्ध,
प्रार्थनाओं के लिए हूँ मैं करबद्ध
हाँ हूँ करबद्ध सदा मैं करबद्ध।।

अमिताभ यांनी शेअर केलेली ही कविता आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्यांचा गुलाबो सिताबो ओटीटीवर रिलीज झाला आहे. याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहेत. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.