Remo D’Souza Health Update : ‘बिग बी’ अमिताभनं रेमो डिसूजा लवकर बरा होण्यासाठी केली प्रार्थना ! जाणून घ्या आता कशीय प्रकृती

पोलिसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध डान्सर आणि कोरियोग्राफर रेमो डिसूजा (Remo D’Souza) ला 11 डिसेंबर रोजी हार्ट अटॅक आला होता. सध्या तो मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहे. त्यांची प्रकृती आता चांगली आहे. अशी आशा आहे लवकरच तो बरा होऊन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेईल. तो बरा होण्यासाठी चाहत्यांसोबत सेलेब्सही प्रार्थना करत आहेत. त्याचे साथीदार गीता कपूर आणि टेरेंस लुईस यांनीही सोशलवर पोस्ट शेअर केल्या आहेत. यानंतर आता बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही पोस्ट शेअर करत रेमोला गेट वेल सून म्हटलं आहे.

अमिताभनं एक ट्विट रिट्विट केलं आहे ज्यात रेमो एका डान्सिंग टीमला जज करताना दिसत आहे. योगयोग असा की, ही टीम अमिताभ यांच्या दीवार च्या एका डायलॉगवर डान्स करत आहे. रेमो या व्हिडीओत बिग बींच्या या डायलॉगची स्तुती करत आहे.

हाच व्हिडीओ रिट्विट करत बिग बी लिहितात, लवकरच ठिक हो रेमो. प्रार्थना. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद.

रेमोची पत्नी रिजेल डिसूजा हॉस्पिटलमध्ये त्याच्या सोबत आहे. फेमस कोरियोग्राफर धर्मेश, सलमान युसूफ हेही हॉस्पिटलबाहेर स्पॉट झाले आहेत.

रेमोच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर फालतू आणि एबीसीडी अशा सिनेमांसाठी त्याला ओळखलं जातं. तो डान्स अकॅडमी देखील चालवतो. रेमोनं डान्स इंडिया डान्स, झलक दिखलाजा आणि स्टार प्लसवरील डान्स प्लस अशा डान्स शोचं जजिंगही केलं आहे. आपल्या उत्तम कोरियोग्राफीसाठी त्याला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यात IIFA अवॉर्ड्स, झी सिने अवॉर्ड्स, स्टार डास्ट अवॉर्ड्स अशा काही पुरस्कारांचा समावेश आहे.