‘या’ आगामी चित्रपटात अमिताभ बच्चन गाणार रॅप सॉन्ग 

मुंबई : वृत्तसंस्था – अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांचा बदला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन रणवीर सिंग सारखे रॅप करताना दिसणार आहे. याचा खुलासा खुद्द चित्रपटाच्या मेकर्सनी केला आहे. ‘औकात’असे या रॅप गाण्याचे बोल असतील.अमिताभ बच्चन स्वत: हे रॅप सॉंग गाणार आहे.
‘बदला’चे दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी सांगितले की, आम्ही या चित्रपटासाठी लिहिलेले रॅप अमिताभ यांच्या आवाजासाठी एकदम फिट ठरले. यातील अमिताभ यांचा कूल अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. या रॅपला क्लींटन सेरेजो याने संगीत दिले आहे आणि तोच या रॅप सॉन्गचा कोरिओग्राफर सुद्धा आहे.
 काही दिवसापूर्वी सुजॉय घोष यांनी या क्राइम-थ्रिलर चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला होता. हा एक मर्डर मिस्ट्री चित्रपट असणार आहे. या  चित्रपटात अमिताभ  बादल गुप्ता नामक पात्र साकारताना दिसणार आहेत. बादल गुप्ता ४० वर्षांत एकही केस हरलेला नाही. पण एक केस त्यांना आव्हान देते. ही केस तापसी पन्नू लढताना दिसतेय . येत्या ८ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात एक जबरदस्त कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी तापसी व अमिताभ यांच्या ‘पिंक’ चित्रपटामध्ये सुद्धा कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांना पहायला मिळाला होता.
यापूर्वी सुजॉय घोष यांने २००९मध्ये  ‘अलादीन’ चित्रपटामध्ये  अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय रितेश देशमुख आणि जॅकलिन फर्नांडिस दिसले होते .