मुलगा अभिषेक बच्चनसोबत सेम आउटफिटमध्ये दिसले ‘Big B’, म्हणाले- ‘बडे मियां तो बडे मियां’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक यांच्यातील बाँडिग चर्चेचा विषय ठरत असतो. अमिताभ अनेकदा अभिषेकचं कौतुक करत असतात. शुक्रवारी (दि 6 मार्च 2020) देखील असंच काहीसं झालं. अमिताभ यांनी एक पोस्ट शेअर केली होती जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनसोबत एक फोटो शेअर केला आहे. फोटोत दोघांनी सेम आउटफिट केल्याचं दिसत आहे. फोटो शेअर करताना बिग बी म्हणतात, “बडे मियां तो बडे मियां, छोटे मिया सुभान अल्लाह. जेव्हा तुमचा मुलगा तुमचे शुज आणि तुमचे कपडे घालतो तेव्हा तो तुमचा मित्र बनतो.” असं त्यांनी म्हटलं आहे.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं. लवकरच हे दोघं बॉब बिस्वास या सिनेमातही एकत्र काम करताना दिसणार आहेत. सुजॉय घोष लिखित या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. अन्नापूर्ण घोष हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. याशिवाय अभिषेक बच्चन बिग बुल या सिनेमातही काम करत आहे. कुकी गुलाटी हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, गुलाबो सिताबो अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर अलीकडेच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.