‘बिग बी’ अमिताभनं शेअर केला तरुणपणातील Unseen फोटो ! चाहत्यांना आवडला ‘स्वॅग’ अन् ‘स्टाईल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या फेमस शो कौन बनेगा करोडपतीचं (Kaun Banega Crorepati) सूत्रसंचालन करत आहे. अमिताभ बच्चन सोशलवर कायमच अ‍ॅक्टीव्ह असतात. अनेकदा त्यांनी शेअर केलेली पोस्ट सोशलवर चर्चेत आल्याचं दिसतं. अमिताभनं नुकताच एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळं ते चर्चेत आले आहेत. खास बात अशीय की त्यांचा हा फोटो प्रदर्शित न झालेल्या सिनेमातील आहे.

अमिताभ यांनी इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं की, हा सिनेमा प्रदर्शित झाला नाही. या सिनेमासाठी असं स्टायलिश फोटोशुट मी केलं होतं.

बिग बींचा हा फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्यांच्या लुकचं कौतुक केलं आहे तर काहींनी त्यांना सिनेमा प्रदर्शित न झाल्याबद्दल सहानुभूती दाखवली आहे. त्यांचा तरुणपणातील स्वॅग मात्र सर्वांनाच आवडला आहे.

करिअरच्या सुरुवातीच्या काळात बिग बी यांनी अनेक बी ग्रेड सिनेमात काम केलं आहे. त्यापैकी काही सिनेमांची निर्मिती अर्ध्यावरच थांबली. तर काही प्रदर्शित होऊ शकले नाही. हा सिनेमाही यापैकीच एक होता.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्यांचा गुलाबो सिताबो ओटीटीवर रिलीज झाला आहे. याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.

You might also like