‘BIG B’ अमिताभनं शेअर केला पत्नी जया बच्चनचा जुना फोटो, बनल्या होत्या ‘स्वामी विवेकानंद’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन त्या स्टार्सपैकी आहेत जे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अमिताभ आपल्या ट्विटर आणि इंस्टावरून नेहमीच काही ना काही पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या पोस्ट कायमच सोशलवर चर्चेत असतात. पुन्हा एकदा असंच काहीसं झालं आहे.

जया बच्चन बनल्या विवेकानंद

अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चनचा एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो जया यांचा बंगाली सिनेमा डागटर बाबू या सिनेमाच्या दरम्यानचा आहे. फोटो शेअर करताना बिग बी म्हणतात, “हा सिनेमा कधीच पूर्ण झाला नाही ज्यामुळे तो रिलीज झाला नाही. जया बच्चननं या सिनेमात स्वामी विवेकानंदांची भूमिका साकारली होती.”

जया बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर द्रोण सिनेमात त्या शेवटच्या दिसल्या होत्या. 2016 साली आलेल्या करीना कपूरच्या की अँड का या सिनेमातही त्यांनी कॅमिओ केला होता.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, गुलाबो सिताबो अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर अलीकडेच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.