‘बिग बी’ अमिताभनं मुलगी श्वेतासोबतचा ‘थ्रोबॅक’ फोटो केला शेअर, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांसारखे काही मोजके असे कलाकार आहेत जे सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह राहतात आणि आपल्या भावना व्यक्त करतात. अमिताभ कधी कधी इंडस्ट्रीचे काही दुर्मिळ फोटो तर कधी फॅमिली फोटो आपल्या चाहत्यांसह शेअर करतात. त्यांना आपली मुलगी श्वेता नंदा बच्चन यांच्यावर विशेष प्रेम आहे. अलीकडेच अमिताभ यांनी श्वेतासोबत कोलाज इमेज शेअर केली आहे.

कोलाजमध्ये अमिताभ आणि श्वेता यांचे जुने चित्र आणि अलीकडील काळाचे छायाचित्र आहे. चित्रासह, अमिताभ यांनी कॅप्शनमध्ये लिहिले- केव्हा ती अश्याची, अशी झाली, कळलेच नाही. अनेक वेळा अमिताभ मुलगी श्वेता आणि अभिषेक सोबतच्या काही जुन्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करतात. श्वेतादेखील आपल्या वडिलांचा तितकाच आदर करते. ती त्यांना भेटायला नेहमी येत असते. अमिताभ यांच्या वाढदिवसा वेळी श्वेता देखील दिसली होती. घराबाहेर असलेल्या चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती दिसली होती.

दरम्यान, बिग बी यांच्याविषयी बोलायचे झाल्यास ते चित्रपटांत सक्रिय असतात. इंडस्ट्रीत भलेही अक्षय कुमार जास्त चित्रपटांत दिसले असतील, मात्र, यामध्ये अमिताभ बच्चनदेखील मागे नाहीत. वर्षभरात ते अनेक चित्रपट करतात. याशिवाय ते टेलिव्हिजन आणि जाहिरातींच्या जगातही खूप सक्रिय आहे. सध्या ते आयुष्मान खुरानासमवेत ‘गुलाबो सीताबो’ मध्ये दिसणार आहे. सोबतच त्यांच्याकडे झुंड आणि चेहरे यांसारखे चित्रपटदेखील आहेत. याशिवाय अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्रातही अमिताभ महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like