‘बिग बी’ अमिताभच्या चेहर्‍यावरील चमक ‘या’ व्यक्तीच्या करामतीमुळं, 47 वर्षापासून आहे सोबत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आपल्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते चाहत्यांसह आणि त्यांच्याबरोबर काम करणार्‍या लोकांशीही चांगले संबंध ठेवतात. अमिताभ बच्चन यांच्या स्टारडमचे आकर्षण असे आहे की दर आठवड्याला हजारो लोक त्यांच्या घराबाहेर येण्यासाठी गर्दी करतात.

याशिवाय त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांवरही अमिताभ विश्वास ठेवतात, कदाचित हेच कारण आहे की चार दशकांनंतरही त्याचा मेकअपमॅन त्यांच्यासोबत आहे. अमिताभ यांनी अनेकदा सांगितले आहे की, पडद्यासमोर दिसणारे त्यांचे लुक पडद्यामागील मेकअप मॅन दिपक सावंत यांची कमाल आहे. नुकतेच अमिताभ यांनी दीपकसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे. दीपक आणि त्यांचा परिवार या पोस्टमध्ये अमिताभ यांच्यासोबत दिसत आहे.

ट्विटरवर पोस्ट करत त्यांनी लिहिले की, ‘दीपक, 47 वर्षांपासून माझा मेकअप मॅन आहे. आपल्या कमाईने त्याने मराठी आणि भोजपुरी चित्रपट केले. त्याचबरोबर आपल्या पत्नीसाठी एक छोटे पार्लर सुरू केले. आज या पार्लरला 40 वर्ष झाले आहे. तीन मजली इमारतीत 40 हून अधिक कर्मचारी आहेत परंतु त्यांनी माझ्या मेकअपच्या कामातून कधीच सुट्टी घेतली नाही.’

1973 मध्ये बिग बी आणि दीपक यांनी प्रथमच एकत्र काम करण्यास सुरवात केली. दीपकने अमिताभ यांचे मेकअप आणि हेअर स्पेशलिस्ट म्हणून काम करण्यास सुरवात केली. अहवालानुसार, अमिताभ यांनी काही दिवस चित्रपटांपासून ब्रेक घेतला, त्यावेळीही अमिताभ हे दीपकची काळजी घ्यायचे. दीपक आजारी असूनही त्यांनी अमिताभ यांनी निर्मित चित्रपटात काम केले आणि या चित्रपटासाठी त्यांनी कोणताच मोबदला घेतला नाही. या दोघांमधील बॉन्डिंगचा अंदाज यावरुनच दिसून येते.

सध्या अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर अमितभ यांचा लवकरच ‘झुंड’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी चित्रपट निर्माता नागराज मंजुळे करीत आहेत. नागराजने यापूर्वी ‘सैराट’ या चित्रपटाद्वारे जबरदस्त चर्चा केली होती. या चित्रपटाच्या नंतरच ‘धड़क’ हा चित्रपट करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसच्या खाली तयार झाला होता, ज्यामुळे जाह्नवी कपूरने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ‘झुंड’ सोडून अमिताभ बच्चन ‘गुलाबो सीताबो’ आणि ‘चेहरे’ मध्ये दिसणार आहेत. आयुष्मान खुरानाही अमिताभ यांच्यासोबत ‘गुलाबो सीताबो’ मध्ये दिसणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा