‘बिग बी’ अमिताभचा अनोख्या कवितेमधून डॉक्टरांना सलाम !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकांना कोरोनाच्या महामारीबद्दल जागरूक जागरूक करणारे बिग बी अमिताभ बच्चन आता कुटुंबासहित कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटीव आल्यानंतर अभिषेक बच्चननंही कोरोना टेस्ट केली आणि त्यालाही कोरोना झाल्याचं समोर आलं. सध्या त्यांच्यावर मुंबईतील नानावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अस असलं तरी ते सोशलवर खूप सक्रिय आहेत. बिग बींनी एक कविता शेअर करत डॉक्टर्स आणि नर्सेसना सलाम केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं आहे. यात त्यांनी एक छोटीशी कविता शेअर केली आहे. डॉक्टरांच्या कार्याला सलाम करत त्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. बिग बींचं हे ट्विट सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. यात अनोख्या शब्दात त्यांनी डॉक्टरांचं वर्णन केलं आहे.

अमिताभ आणि अभिषेक दोघांवरही उपचार सुरू आहेत. उपचाराला ते चांगला प्रतिसाद देत आहेत. किमान 7 दिवस तरी त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येणार आहे. ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या यांना घरातच क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्यांचा गुलाबो सिताबो ओटीटीवर रिलीज झाला आहे. याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.