‘ट्रम्प-मोदी’ यांच्या मेगा ‘शो’मध्ये बॉलिवूडमधील दिग्गजांना ‘निमंत्रण’, पोहचणार ‘बिग बी’ अमिताभ-सोनम कपूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी भारतात येणार आहेत. भारतात आल्यानंतर ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गृह राज्य गुजरातला जाणार आहे. देशभर ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची चर्चा होताना दिसत आहे. ट्रम्प भारतात आल्यानंतर ते रोड शोचा हिस्साही बनणार आहेत. याशिवाय ते मोटेरा स्टेडियमचं उद्घाटनही करणार आहेत. या कार्यक्रमासाठी गुजरात सरकारनं बॉलिवूड स्टार्सला आमंत्रण दिलं आहे.

मोटेरा स्टेडियममध्ये होणाऱ्या या समारंभात बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. यात बिग बी अमिताभ बच्चन, सोनम कपूर सहित अनेक बड्या नावांचा समावेश आहे. सध्या फक्त सोनम कपूर आणि अमिताभ बच्चन यांचं नाव समोर आलं आहे. सध्या सर्वांच्या नजरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावर लागल्या आहेत.

खास असणार डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला नमस्ते ट्रम्प असं नाव देण्यात आलं आहे. याशिवाय याला टू ग्रेट डेमोक्रेसी ऐट द वर्ल्ड बिगेस्ट क्रिकेट स्टेडियम, ब्रिंगिंग इंडिया अँड अमेरिका टुगेदर ऐट दी वर्ल्ड बिगेस्ट क्रिकेट स्टेडियम, वर्ल्ड ओल्डेस्ट डेमोक्रेसी मीट्स वर्ल्ड लार्जेस्ट डेमोक्रेसी अशा अनेक टॅगलाईन देण्यात आल्या आहेत.