अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी दिली ‘ही’ माहिती !

पोलिसनामा ऑनलाईन – महानायक अमिताभ बच्चन आणि मुलगा अभिषेक यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली. त्यांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत होता. मात्र, सध्या अमिताभ बच्चन यांना व्हेंटिलेटरवर ठेवणार नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

डॉक्टरांना अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीसंबंधी काही चिंता करण्यासारखे आहे का? असे विचारले असता, त्यांचे वय आणि आधी झालेली जखम यावर ते अवलंबून आहे. अमिताभ बच्चन 1982 साली ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर जखमी झाले होते. पण त्यातून बरे झाल्यानंतर ते अतिशय शिस्तबद्धपणे जगत असून इतक्या वर्षांमध्ये कोणताही त्रास जाणवलेला नाही. डॉक्टरांनी अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल असेही सांगितले आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना यासंबंधी माहिती दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like