‘डॉन को पकडना मुश्कील ही नहीं, नामुमकिन है’ !

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बिग बींनी स्वत: ट्विट करत त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली. बिग बींना करोनाची लागण झाल्याचं समजल्यानंतर अनेकांनी ते बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. अगदी बॉलिवूडपासून ते मराठी कलाविश्वापर्यंत अनेक सेलिब्रिटींपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. यात मराठी चित्रपट दिग्दर्शक, लेखक केदार शिंदेनेदेखील बिग बींसाठी प्रार्थना केली आहे.

बिग बींना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच केदार शिंदेने फेसबुकवर पोस्ट शेअर करत ‘डॉन को पकडना मुश्कील ही नहीं, नामुमकिन है’, असे म्हटले आहे. लवकर बरे व्हा, तुम्ही लवकर बरे होण्यासाठी अनेकांनी देवाकडे प्रार्थना करण्यास सुरुवातही केली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो आहे. काही चाचण्या आणखीही केल्या जाणार आहेत. मागील 10 दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनीही चाचणी करावी असे आवाहन मी करतो आहे. असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे. दरम्यान, बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. मात्र त्यांना करोनाची लक्षणे नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.