मुंबईतील पावसामुळे ‘बिग बी’ परेशान, ट्विंकल खन्नासोबतच ‘या’ कलाकरांचे मीम्स ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पावसाला सुरुवात झाली की, मुंबईत रस्त्यांवर सर्वत्र पाणी साठायला सुरुवात होते. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असणाऱ्या पावसामुळे सामान्यांसोबत बॉलिवूड सेलिब्रिटींनाही त्रास सहन करावा लागत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यामातून आपली अडचण बोलून दाखवली आहे. यामध्ये अमिताभ बच्चन ट्विंकल खन्ना तसेच टीव्ही अॅक्टरचाही समावेश आहे.

अमिताभ बच्चन यांनी एक मीम शेअर केलं आहे. अमिताभ यांनी लिहिलं आहे की, “जलसा होते हुए” बिग बी यांनी जे मीम शेअर केलं आहे त्यात ते जीनत अमान सोबत नावेत बसलेले दिसत आहे आणि म्हणत आहेत, “भैय्या गोरेगांव लेना” दुसरीकडे सोनम कपूरनेही मुंबई पोलीस आणि बीएमसीला टॅग करत ट्विट केलं आहे.

सोनमने लिहिलं आहे की, “कोणी मला सांगेल का की, विमानतळ सुरु आहे किंवा नाही.” तर गेल्या रात्री अजय देवगनची हिरोईन रकुल प्रीत सिंहदेखील एअरपोर्टवर फसली होती. याची माहिती देखील रकुलने सोनमच्या ट्विटवर कमेंट करून दिली होती.

मजेदार बाब अशी की, मुबंईमध्ये मान्सूनचे आगमन होताच अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलगी नितारा सोबत लंडनला निघाले होते. नुकतंच त्यांना एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. पावसामुळे त्यांचा प्लॅनही फ्लॉप झाला. ट्विंकल खन्नानेही आपल्या घरी परत येण्याची माहिती मजेदार ट्विटने दिली.

ट्विंकल खन्नाने लिहिले की, “गेल्या रात्री कॅप्टनसाठी विमान चालवण्यापेक्षा जहाजाची जबाबदारी सांभाळणं जास्त चांगलं होतं. प्लेन स्किडींग, रनवेमध्ये पूर आला आणि आम्ही सगळे घरी परत आलो.” या ट्विटवर ईशा गुप्ताने कमेंट करत लिहिले की, “जेव्हा याचे काही उत्तर नसते की, मुंबईत इतकं पाणी का साठतं. तेव्हा प्रशासन हवामान बदलाला जबाबदार ठरवतं. प्रत्यक्ष पाहता ही सगळी अडचण एमएनसीमुळे झाली आहे. 101 स्तराचा भ्रष्टाचार.”

https://twitter.com/eshagupta2811/status/1145910616281866240

ईशाने पुढे लिहिले की, “मुंबईवाल्यांना विनंती आहे की, जर ते कोण्या गरजूला मदत करू शकत असतील तर नक्कीच करा. माणूस एखाद्याची मदत घेऊ शकतो परंतु जनावरांचं काय. त्यांना नाही माहीत काय करावं? कोठे जावं? टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसूजाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून सांगितले की, ती कशा प्रकारे पाण्यात अडकली होती आणि करण पटेलने तिला कशी मदत केली.

क्रिस्टलने व्हिडीओ शेअर करत लिहिले होते की, “आम्ही रस्त्यावर पूरामध्ये खूप वेळ अडकून होतो. त्यानंतर आम्ही करणला फोन केला. तो जवळच राहतो. त्याच्याकडे एसयुव्ही आहे. तो लगेचच आम्हाला घ्यायला आला. दुर्दैवाने त्याच्या गाडीचंही नुकसान झालं आहे.

सुंदर दिसायचय ? ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी