home page top 1

बिग बी अमिताभ बच्चन झाले पुन्हा ‘ट्रोल’ ; जाणून घ्या कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूडचे ‘बिग बी’ म्हणजे अमिताभ बच्चन नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकतेच अमिताभ बच्चन यांनी ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ कंपनीचे मालक आनंद महिंद्रा आणि मुंबई महानगर पालिका (BMC) यांना उद्देशून ट्विट केले होते. या ट्विटमध्ये अमिताभ बच्चन यांनी मुंबई महानगर पालिकेला दिलेल्या काही मशीनींचाही उल्लेख केला आहे. त्यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून या ट्वीटवर संमिश्र प्रतिसाद उमटताना दिसत आहेत. काहींनी त्यांना ट्रोल केले आहे तर काहींनी त्यांचे समर्थन केले आहे.

गुजरातमधील एका हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून १५ जून रोजी चार जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अनेकांनी सोशल मीडियावर यावर ताशेरे ओढले होते. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेल्या आनंद महिंद्रांनी या घटनेबद्दल आपला राग जाहीरपणे व्यक्त करताना ट्विट केले होते की , ‘खूप झालं आता… लोकांच्या आयुष्याशी खेळणं पुरे झालं. काही दिवसांपूर्वी मी स्वयंचलीत स्कॅव्हेंगिंग मशीनबद्दल ट्वीट केलं होतं. एका होतकरू मुलाने हे मशिन तयार केलं आहे. इतरांनीही वेगळ्या पद्धतीने हे मशीन तयार केलं आहे. त्यांचं हे ज्ञान घेण्यास कोणता अडथळा येत आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी पैसा कसा उभा करायचा हा प्रश्न असेल तर माझा विचार नक्की करा.’

त्यांच्या या ट्विटला उत्तर देताना अमिताभ बच्चन म्हणाले आहेत की , ‘मी बीएमसीला २५ मशीन्स आणि एक ट्रक भेट दिली. यामध्ये मशीन प्रत्येक व्यक्तीला भेट म्हणून दिली आणि ट्रक बीएमसीला भेट दिला. या मशीन औरंगाबादच्या कंपनीने तयार केल्या आहेत . या गोष्टींचा प्रचार करण्याचे कारण नाही. मात्र त्यामागचे भीषण वास्तव सांगितले पाहिजे. काही दिवसांपूर्वी वाडोदरामध्ये एक हॉटेलची सेप्टिक टँक साफ करताना चार सफाई कर्मचारी मृत्यू झाला होता. या घटनेची भयानकता लोकांना कळणे गरजेचे होते.’

मात्र अमिताभ बच्चन यांना या ट्विटमुळे त्यांना ट्रोलही व्हावे लागले आहे. त्यांच्या ट्विटवर रिप्लाय देताना काहींनी जर तुम्ही काय भेट दिली हे जर तुम्हाला सांगायचंच नव्हतं तर आता तरी का सांगितलं अशी टीका केली आहे तर काहींनी अमिताभ यांचे समर्थन केले आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय जरूर करा

मोदींनी केला ‘शशांकासन’ चा व्हीडिओ शेयर

गर्भवती महिलांना हे संकेत मिळाले तर त्यांची प्रसूती कधीही होऊ शकते.

पंतप्रधान मोदींनी सांगितले पवनमुक्तासनाचे फायदे

Loading...
You might also like