‘बिग बी’ अमिताभनं केलं मुहूर्ताबाबत ‘मनमोहक’ ट्विट, म्हणाले – ‘आयुष्य आणि मृत्यू निश्चित’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सेलिब्रिटींच्या सोशल मीडियावरील सक्रियतेबद्दल बोलायचं झालं तर बिग बी अमिताभ बच्चन खूपच अग्रेसर आहेत. बिग बी ट्विटरवर नेहमीच काही ना काही शेअर करत असतात. नुकतंच त्यांनी मुहूर्ताबद्दल रोचक ट्विट केलं आहे आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बिग बींनी विचारला मजेदार प्रश्न
मुहूर्तांच्या मागे धावण्याला मनाई करत बिग यांनी रोचक ट्विट केलं. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “आपल्याला चांगलंच माहिती आहे की, आपण कोणत्यााही मुहूर्ताशिवाय जन्माला येतो आणि कोणत्याही मुहूर्ताशिवाय आपला मृत्यूही होणार आहे. तरीही आयुष्यभर आपण मुहूर्ताच्या मागे का धावत असतो. कोणी याचं उत्तर देऊ शकतं का ?”

बिग बींच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनीही चांगली मजा घेतली. एका चाहत्यानं म्हटलं की, मुहूर्त शॉटशिवाय मुव्ही बनवायलाही सुरुवात होत नाही. श्रद्धा आणि हिंदू रिवाज. आणखी एकानं लिहिलं की, आता नाही, मुहूर्त पाहून बोलणार.

एकानं तर त्यांना चिमटा काढत म्हटलं की, “याच मुहूर्तामुळे ऐश्वर्याचं लग्न आधी पिंपळाच्या झाडाशी लावलं आणि नंतर अभिषेकसोबत.”

सोशलवर बिग बींचं असं मजेदार संभाषण सुरूच असतं. काही ना काही कारणानं ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात येतच असतात.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. लवकरच ते गुलाबो सिताबो, झुंड, चेहरे आणि ब्रह्मास्त्र अशा अनेक सिनेमात काम करताना दिसणार आहेत. झुंडचा टीजरही रिलीज करण्यात आला आहे. गुलाबो सिताबो मध्ये ते आयुष्मान खुराना सोबत तर चेहरेमध्ये इम्रान हाश्मी आणि ब्रह्मास्त्र या सिनेमात रणबीर-आलिया यांच्यासोबत काम करताना दिसणार आहेत.

You might also like