‘टायपिंगमध्ये चूक झाली तर क्षमा करा’ असे लिहित अमिताभ बच्चन यांची प्रकृतीविषयी माहिती; वाचा काय झालं त्यांना…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘बिग बी’ अमिताभ बच्चन हे आजारी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आता त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्यानंतर आता ते लवकरच बरे व्हावेत, यासाठी त्यांच्या चाहत्यांनी प्रार्थना सुरु केल्या आहेत. त्यांच्यावर ऑपरेशन केले गेले आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर कशासाठी ऑपरेशन करण्यात आले याची माहिती त्यांनी स्वत: पोस्ट करून दिली.

78 वर्षीय अमिताभ बच्चन यांचे जगभरात चाहते आहेत. त्यांना काहीही झाले तरी चाहत्यांचे मन विचलित होते. बिग बींनी यापूर्वी केलेल्या पोस्टनंतर ते बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करत आहेत. त्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आरोग्याबाबत माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी तब्येत बरी नसल्याचे सांगितले. ऑपरेशन होणार आहे. मात्र, त्यांनी कशावर ऑपरेशन केले जाणार असल्याची माहिती दिली नाही. त्यामुळे चाहत्यांनी ते पुन्हा बरे व्हावेत म्हणून सदिच्छा व्यक्त केल्या.

आता त्यांनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये सांगितले, की त्यांच्या डोळ्यांवर ऑपरेशन केले गेले आहे. त्यासह त्यांनी हेल्थ अपडेटही दिले. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिले, की या वयात डोळ्यांवर ऑपरेशन करणे धोकादायक ठरू शकते. मोठी काळजी घ्यावी लागते. माझ्या डोळ्यांवर यशस्वीरित्या ऑपरेशन करण्यात आले आहे. रिकव्हरीही थोडी हळू होत आहे. जर टायपिंग करताना कोणती चूक झाली तर क्षमा करा, असेही म्हटले.

हळूहळू प्रकृतीत सुधारणा
‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी सर्वांना माझा सलाम. माझ्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. माझ्या दुसऱ्या डोळ्यांवरही ऑपरेशन केले जाणार आहे. माझ्या पुढच्या ‘गुड बॉय’ या प्रोजेक्टपूर्वी सर्व काही ठिक व्हावे, हीच आशा करतो.