Amitabh Bachchan | “मला तुला मारावेसे वाटत आहे”, असे अमिताभ बच्चन का म्हणाले होते राम गोपाल वर्मांना

पोलीसनामा ऑनलाइन – Amitabh Bachchan | दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी अनेक हिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहे. यामध्ये त्यांच्या भूत चित्रपटाला येवून 20 वर्षे झाली आहेत. अजय देवगण (Ajay Devgan) आणि उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या या चित्रपटात अनेक भयावह सीन दाखवण्यात आले होते. हा चित्रपट बघून बीग बी (Big B) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देखील राम गोपाल वर्मावर चिडले होते व मला तुला मारावं असं वाटतं आहे, अशी प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी दिली होती.

राम गोपाल वर्मा यांनी एका मुलाखतीमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा हा किस्सा शेअर केला होता. मुलाखतीदरम्यान ते म्हणाले होते की, भूत चित्रपट (Bhoot Movie) पाहिल्यानंतर त्यांची आई देखील घाबरली होती आणि ती तिच्या घराचे दरवाजे कायम बंद करत असे. आपल्याच मुलाने हा चित्रपट बनवल्याचे माहित असूनही आई खूप घाबरली होती. तसेच त्यांनी अमिताभ बच्चन यांची त्यांच्या चित्रपटाबाबत मज्जेशीर प्रतिक्रियाही सांगितली होती.

अमिताभ बच्चन यांनी जेव्हा भूत चित्रपटाचा प्रिव्यू पाहिला तेव्हा त्यांची रिक्शन अतिशय भन्नाट होती.
ते राम गोपाल वर्मा यांना म्हणाले होते की, “मला तुला मारावेसे वाटत आहे”.
बिग बींनी चित्रपटाची अशी प्रतिक्रिया वर्मा यांना दिली होती. मी असा चित्रपट का बनवला, असेही त्यांनी मला विचारले.
“हा चित्रपट बघायला मी (अमिताभ बच्चन) का आलो? असा विचार करून मी स्वत:चाच तिरस्कार करत होतो”,
अशी स्पष्ट प्रतिक्रिया अमिताभ यांनी राम गोपाल वर्मा यांच्यासमोर व्यक्त केली होती.
अमिताभ बच्चन यांनी राम गोपाल वर्मा यांच्या सरकार (Sarkar), सरकार राज (Sarkar Raj), सरकार 3 (Sarkar 3),
राम गोपाल वर्मा की आग (Ram Gopal Varma Ki Aag), रन (Runn), बुढा होगा तेरा बाप
(Budha Honga Tera Bap), निशब्द (Nishabd) अशा अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.

Web Title :   Amitabh Bachchan | Why did Amitabh Bachchan say “I want to kill you” to Ram Gopal Varma?

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवा, नांदेड खून प्रकरणावर शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | ‘दुसऱ्या धर्मातील व्यक्तीसोबत लग्न करण्यावर आक्षेप नसावा, पण…’, देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान (व्हिडिओ)

Ajit Pawar | ‘मिठाचा खडा कुणी टाकण्याचा…’, मविआतील जागावाटपावर अजित पवार स्पष्टच बोलले