टेस्ट रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ ! ‘महानायक’ अमिताभ म्हणाले – ‘चूकीचं, बेजबाबदार, बोगस आणि प्रचंड खोटं’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : लोकांना कोरोनाच्या महामारीबद्दल जागरूक जागरूक करणारे बिग बी अमिताभ बच्चन कुटुंबासहित कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. परंतु आता बिग बी अमिताभ यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे अशा बातम्या समोर येताना दिसल्या. लवकरच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल असं सांगितलं गेलं. परंतु या अफवा असल्याचं समोर येत आहे. खुद्द बिग बी अमिताभ यांनीच या अफवांना पूर्ण विराम दिला आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं आहे की, या बातम्या चुकीच्या बेजबाबदार आणि खोट्या आहेत. सध्या त्यांच्यावर मुंबईच्या नानावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 11 जुलै रोजी मुंबईच्या नानावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून ते यावर उपचार घेत आहेत. अमिताभ सोशलवर सतत सक्रिय असून सतत ते चाहत्यांसोबत संपर्क साधत असतात.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्यांचा गुलाबो सिताबो ओटीटीवर रिलीज झाला आहे. याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.