अखेर अमिताभ बच्चन यांचे ‘ते’ वचनही झाले पूर्ण !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील सुपरस्टार अमिताभ बच्चन हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. महाराष्ट्र असो किंवा उत्तरप्रदेश, शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी ‘बिग बी’ नेहमीच पुढाकार घेऊन मदतीचा हात देत असतात; पण अमिताभ बच्चन यांना पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे वचन पूर्ण करायची इच्छा होती आणि अखेर पूर्ण झाली आहे.

https://twitter.com/SrBachchan/status/1138902760353554432

खुद्द बिग बी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. अमिताभ यांनी शहीद झालेल्या प्रत्येक जवानांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत केली आहे. आणि ही एक इच्छा पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त केले आहे. जो सोचा था, जो कहा था, वो आज पूरा हुआ; देश के रक्षक को जो देना था दिया; संतुष्टि न कहना इसे, उदाहरण बन सकें यदि हम, तो प्रफुल्लित होवे हिया’ अशा शब्दात ट्विटरवर त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

आरोग्य विषयक वृत्त-
तुमच्या मनातही आहेत का ? रक्तदानाविषयी हे ‘गैरसमज’
यकृत निरोगी राहण्यासाठी महत्वाच्या टिप्स
पाणी आणि मिठाने दूर करा ‘या’ १० सौंदर्य समस्या

Loading...
You might also like