अमिताभ गुप्ता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रात्री उशिरा या बदल्यांचे आदेश गृहविभागाने काढले आहेत. मावळते आयुक्त डॉ के. व्यंकटेशम यांची बदली करण्यात आली आहे. व्यंकटेशम यांचा कार्यकाळ चर्चेत राहिला असून, पुणे पोलीस दलात सुसत्रीकरण आण्यासोबतच त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले.

शासनाने आज राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात पुणे पोलीस आयुक्त यांची देखील बदली झाली. दरम्यान पुण्याच्या पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. व्यंकटेशम यांनी अनेक नवीन उपक्रम सुरू केले. तर कित्येक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या तक्रारींचा निपटारा देखील केला. यामुळे अनेक वर्षांपासून उगाच भरमसाठ वाठणाऱ्या गुन्ह्यांची आकडेवारी झपाट्याने कमी झालीच पण तक्रारीत 9-16 ची प्रकरणे बंद झाली. वरिष्ठ निरीक्षक, अधिकाऱ्यांचा हिरमोड झाला.

पुण्यासोबतच पूर्ण राज्य पोलीस दलात सर्वाधिक गाजली ती पुण्यात सुरू केलेली टीआरएम मिटिंग. याला वरिष्ठ अधिकारी वैतागले होते. अनेकांनी निराशा व्यक्त केली होती. पण ही बैठक नंतर पुणेकरांच्या भल्याचीच ठरली. अनेकांनी त्याचे कौतूक देखील केले. यासोबत “सेवा” उपक्रम राज्य पोलीस दलात गाजला गेला. सेवा उपक्रमाचा सर्वाधिक लाभ तक्रारदार आणि त्यानंतर पोलिसांना देखील झाला. यामुळे कोणाचे काम तर अडले नाहीच, पण तक्रारीचा निपटारा देखील लवकर झाला. त्यात कामचुकार पणा किंवा अन्याय देखील झाला नाही. या उपक्रमाचे राज्यभर कौतूक झाले. अनेक अधिकाऱ्यांनी हा उपक्रम सुरू करण्याची तयारी दर्शवली. यामुळे नंतर गृहविभागाने हा उपक्रम राज्य पोलीस दलात सुरू करण्यात येईल असे जाहीर केले.

यासोबतच आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या पोलीस अन वसुली भाईंना मुख्यालयाचा रस्ता दाखवला. तर कधी नव्हे ते पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देखील कोणीही ठरले गेले. पण त्यानंतर देखील आयुक्तांनी कुठे थोडीफार चूक झाल्यानंतर त्यांना पोलीस आयुक्तालयात तात्काळ बोलवले आणि त्यांना विशेष शाखेत विशेष जबाबदारी देण्यात आली. तर काम करणाऱ्यांना त्यांनी बक्षीस देखील तितकेच केले. मात्र काम चुकार पणा करणाऱ्यांची गय केली नाही.

पोलीस कर्मचारी देखील त्यांच्याशी सहज मोकळ्या मनाने अडचणी सांगत असे. ते शांत ऐकून घेत. तर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी त्यांनी भावनिक प्रज्ञावंत कार्यशाळा आयोजित केल्या. त्याचा फायदा पोलिसांना झाला.

वाहतूक शाखेला अप्पर आयुक्त मिळाले

डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुण्यातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कडक पावले उचलली. यात त्यांनी अनेक वर्षांपासून वाहतूक शाखेचे प्रमुख असणाऱ्या पोलीस उपायुक्त ऐवजी याची जबाबदारी अप्पर पोलीस आयुक्त यांच्या खाद्यावर दिली. त्यामुळे प्रथमच वाहतूक विभागाला अप्पर आयुक्त दर्जाचा अधिकारी मिळाला.

यासोबतच आयुक्तांचा अवडतीची हेल्मेट सक्ती देखील केली. जी यापूर्वी इतक्या प्रमाणात कधी झाली नव्हती. त्यांच्या सक्तीनुसार यातून मोठ्या प्रमाणात दंड करण्यात आला. दोन वर्षात जवळपास 150 कोटींहून अधिक दंड बेशिस्त वाहन चालकांना लावण्यात आला. 1 कोटींहून अधिक दंड वसूल देखील झाला. यामुळे काही प्रमाणात वाहतुकीत देखील सुधारणा झाली आणि वाहन चालकांच्या डोक्यावर हेल्मेट दिसू लागली आहेत. त्याचे श्रेय डॉ. व्यंकटेशम यांनाच द्यावे लागेल.