अमिताभ गुप्ता यांच्याकडून ‘ती’ चूक झाली, पण ते एक कर्तव्य दक्ष अधिकारी : गृहमंत्री अनिल देशमुख

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – अमिताभ गुप्ता यांच्याकडून वाधवान कुटुंबाच्या प्रकरणात चूक झाली. त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. त्यांची चौकशी झाली आणि त्याबाबत त्यांच्यावर कारवाई देखील झाली आहे. पण गुप्ता यांचे पूर्ण काम पाहिल्यानंतर ते एक कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत. त्यांचे काम चांगले आहे, असे समर्थन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकारांशी सवांद साधला. यावेळी ते बोलत होते.

पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती शासनाने केल्यानंतर पोलीस दलात मोठी चर्चा सुरू झाली होती. कोरोनाच्या काळात घडलेले वाधवान प्रकरण राज्यात गाजले होते. यानंतर गुप्ता यांची चौकशी झाली आहे. त्यातून त्यांच्यावर कारवाई झाली असल्याचे स्पष्ट करत देशमुख म्हणाले, गुप्ता चांगले अधिकारी आहेत. त्यांच्या हातून ती चूक झाली. त्याबाबत त्यांच्यावर रीतसर कारवाई झाली आहे. पण ते एक कर्तव्य दक्ष अधिकारी असून, त्यांचे काम चांगले आहे. त्यांना कुठेतरी जबाबदारी द्यायची होती. ती दिली आहे.

देशमुख म्हणाले, कोरोनाच्या काळात पोलिस गेल्या काही महिन्यांपासून काम करत आहेत. ‘पोलीस थकले आहेत, पण हिम्मत हारलेले नाहीत’. राज्यात पोलिसांच काम खूपच चांगल आहे. कोरोनाच्या काळात काम करताना पोलीस देखील संक्रमित झाले. त्यांच्यासाठी त्या-त्या पोलीस अधीक्षक व आयुक्तांनी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. तर योग्य उपचार मिळतील याकडे विशेष लक्ष दिले आहे. पण दुर्दैवाने राज्यात 208 पोलीस शहीद झाले आहेत. शासनाकडून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून 65 लाख रुपये दिले गेले आहेत. तसेच निवृत्त होईपर्यंत शासकीय निवस्थानात त्याच्या कुटुंबाला राहत येईल, असा देखील निर्णय घेतला आहे. या परिस्थितीत त्यांच्या कुटुंबाला दुसरीकडे जाण्याची वेळ येणार नाही, तसेच त्यांना अडचणी येऊ नये यासाठी शासन कटिबद्ध आहे. तर राज्यात 55 वर्षीच्या पुढील पोलिसांना घरीच राहून काम करण्यास सांगितले होते. तर त्यांना ठाण्यातच ड्युटी दिली गेली.

राज्यात पोलिस भरती

राज्यात शासनाकडून साडे बारा हजार पोलीस भरती केली जात आहेत. मागच्या वेळेस 5 हजार पोलीसांची भरती होती. त्यावेळी 12 हजार अर्ज आले होते. त्यामुळे यावेळी भरपूर अर्ज येतील. या प्रक्रियेला वेळ लागेल. तर मराठा आरक्षण बाबतीतचा मुद्दा आहे. पण यात मराठा तरुणांना अन्याय होणार नाही. 13 टक्के जागा ठेऊन ही भरती होईल. कोणत्याही समाजावर अन्याय हिणार नाही.

विधानाचा विपर्यास

पोलीस अधिकारी शासन पडण्याचा प्रयत्नात होते, हे विधान माझ्याकडून झालेले नाही. ते माझ्या तोंडी घातलेले गेलेले आहे. माझी क्लिप पहावी. हे विधान पूर्ण चुकीचे आहे. मी असे म्हणलो नाही.