ऋषी कपूरवर ‘बिग बी’ अमिताभनं लिहिला ‘ब्लॉग’, म्हणाले – ‘…म्हणून मी त्यांना पाहण्यासाठी कधीच हॉस्पिटलमध्ये गेलो नाही’ !

पोलिसनामा ऑनलाइन –दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर सर्वात आधी बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं होतं. मी आतून तुटलो आहे असं त्यांनी म्हटलं होतं. परंतु नंतर मात्र त्यांनी हे ट्विट डिलीट केलं. यानंतर सायंकाळी त्यांनी एक ब्लॉग लिहिला. यात ऋषी यांना पहिल्यांदा पाहण्यापासून तर त्यांच्या आपापसातील संबंधांबद्दल अनेक गोष्टींचा उल्लेख आहे.

बिग बी लिहितात की, “राज कपूर साहेबांनी मला एका सायंकाळी बोलावलं होतं. इथंच मी पहिल्यांदा ऋषी यांना चेंबूरच्या देवनार कॉटेजमध्ये पाहिलं होतं. त्यांची चालणं बोलणं एकदम वेगळं होतं. नंतर आर के स्टु़डिओजमध्ये ते कायम दिसायचे. त्यांना बॉबी सिनेमासाठी तयार केलं जात होतं. त्यांचं चालणं एकदम बिंधास्त होतं. कधी कधी त्यांचा अंदाज तर महान पृथ्वीराज कपूर यांच्याशी मिळता जुळता असायचा. ते एकदम जेनुइन होते. आम्ही अनेक सिनेमात एकत्र काम केलं आहे. त्यांचं गाण्यांवर लिप सिंक करणं एवढं उत्तम होतं की, क्वचितच कोणी करेल.”

पुढे बिग बी म्हणतात, “त्यांच्या आजारपणात जेव्हा त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी याची कधी जाणीव नाही होऊ दिली की, त्यांना कसला आजार आहे. ते नेहमीच म्हणायचे. तुम्हाला लवकरच भेटेल. हे तर हॉस्पिटलला जाणं येणं सुरुच असतं. मी लवकरच परत येईल.”

बिग बी यांनी लिहिलं की