अभिषेकच्या जन्माच्या दिवशीच ‘बिग बी’ अमिताभकडून झाली होती ‘ही’ मोठी चूक, आजही होतो ‘पश्चाताप’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार बिग बी अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितलं आहे की, अभिषेकच्या जन्माच्या वेळी ते किती खुश होते. याच आनंदाच्या भरात त्यांनी कशी एक चूक केली हेही त्यांनी सांगितलं आहे. या चुकीमुळे अनेक लोकांची नोकरी जाण्याची शक्यता होती. ही चूक वाचल्यावर तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही.

बिग बी अमिताभ म्हणाले, “अभिषेकच्या जन्माच्या वेळी माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. माझ्याकडे काम करणाऱ्या ड्रायव्हर, नोकरांना मी मिठाई वाटली. इतकेच नाही तर हॉस्पिटलमध्ये उपस्थित सर्व डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय आणि कर्माचाऱ्यांना वाईन पाजली होती. जेव्हा हॉस्पिटलच्या हेडला याची माहिती मिळाली तेव्हा ते सर्वांनाच नोकरीवरून काढणार होते. कारण त्यांनी ऑन ड्युटी मद्यापान केलं होतं. यानंतर मी जाऊन हे प्रकरण हाताळलं आणि सर्वांची नोकरी वाचली. मी माझी चूक मान्य केली.”

5 फेब्रुवारी 1976 रोजी मुंबईत अभिषेकचा जन्म झाला. बिग बी अमिताभ यांचं हे दुसरं आपत्य आणि एकुलता एक मुलगा आहे. बिग बी अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्यात कायमच एक केमिस्ट्री दिसली आहे. अभिषेकचं करिअर खास काही चाललं नाही. परंतु बाप लेकांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं आहे. बंटी और बबली, पा, झूम बराबर झूम, सरकार, कभी अलविदा ना कहना, सरकार असे अनेक त्यांचे सिनेमे सांगता येतील.

View this post on Instagram

❤️ 📸: @aishwaryaraibachchan_arb

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

View this post on Instagram

Go Vote! 🇮🇳

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

View this post on Instagram

Happy New Year. 🥂

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

You might also like