‘शोले’ चा ‘गब्बर’ अमजद खानचा भाऊ इम्तियाज खानचं निधन, बॉलिवूडमध्ये ‘शोककळा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि शोले सिनेमातील गब्बर सिंग अमजद खान याचा भाऊ आणि एक अभिनेता इम्तियाज खान यानं जगाचा निरोप घेतला आहे. असं सांगितलं जात आहे की, 15 मार्च 2020 रोजी इम्तियाज खानचं निधन झालं आहे. इम्तियाज खान प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री कृतिका देसाईचा पती होता. त्याच्या निधन वार्तानंतर आता इंडस्ट्रीतील लोक शोक व्यक्त करताना दिसत आहेत. अनेक स्टार्सनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत त्याला श्रद्धांजली दिली आहे.

बॉलिवूड स्टार जावेद जाफरी यानंही इम्तिजाय खान बद्दल ट्विट करत इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. जावेदनं अमजद खान आणि इम्तियाज खान यांचा एक फोटो शेअर केला आहे. जावेदनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “सीनीयर अ‍ॅक्टर इम्तिजाय खानचं निधन. त्यांच्या सोबत ‘गँग’मध्ये (सिनेमा) काम केलं होतं. शानदार अ‍ॅक्टर आणि एक चांगला माणूस. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.”

अ‍ॅक्ट्रेस अंजू महेंद्रू हिनंही पोस्ट शेअर केला आहे. अंजूनं तिचा आणि इम्तिजाय खान, अमजद खान आणि त्यांच्या फॅमिलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. अंजून लिहिलं की, “एकेकाळची गोष्ट आहे. माझ्या मित्रा इम्तिजाय खान देव तुझ्या आत्म्याला शांती देवो.” अभिनेता अमजद खानचं निधन 1992 सालीच झालं आहे.

इम्तियाजच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं नूर जहां, हलचल, गँग अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. 1973 साली आलेल्या यादों की बारात या सिनेमात त्यानं साकारलेली रूपेशची भूमिका यादगार आहे. त्याला अमजद खानसारखी ओळख तर नाही मिळाली परंतु फिल्म इंडस्ट्रीत त्याचं अमूल्य योगदान आहे. इम्तियाज खान इंडस्ट्रीतील हे एक मोठं नाव आहे. त्यानं अभिनयासोबतच दिग्दर्शनातही हात आजमावला आहे.