Amla 7 Benefits : आवळ्यात व्हिटॅमिन-सी, जाणून घ्या अस्थमा आणि इम्यूनिटीसाठी किती लाभदायक

पोलीसनामा ऑनलाइन – आवळा आरोग्यासाठी खुपच लाभदायक फळ आहे. आवळ्यात व्हिटॅमिन-सी आढळते, जे इम्यूनिटी आणि मेटाबॉलिज्म वाढवण्याचे काम करते. आवळा सर्दी, कफशिवाय शरीरात व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ देत नाही. आवळ्यात अशी तत्व आहेत, जी कॅन्सरच्या पेशींशी लढण्याचे काम करतात. आवळा ज्यूस शरीराच्या सर्व प्रक्रियांना संतुलित ठेवतो आणि त्रिदोष म्हणजे वात, कफ, पित्त नष्ट करतो.

आवळ्याचे हे आहेत फायदे
1 अस्थमा/डायबिटीज/पचनक्रिया/इम्यूनिटी
आवळा अस्थमात लाभदायक आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा नियंत्रणात ठेवतो. पचनक्रिया योग्य राहते. इम्यूनिटी आणि रेस्पिरेटरी ट्रॅक्ट दोन्हीसाठी चांगला आहे.

2 कोलेस्ट्रॉल
आवळा ज्यूस नियमित सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो. हृदय चांगल्याप्रकारे काम करते.

3 लिव्हरसाठी लाभदायक
आवळा लिव्हर निरोगी ठेवण्याचे काम करतो. शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो.

4 तोंडातील फोड
हेल्थ एक्सपर्ट सांगतात, खोकला आणि फ्लूसह तोंडातील फोडांवर आवळ लाभदायक आहे. दोन चमचे आवळा ज्यूस दोन चमचे मधासोबत रोज घेतल्यास सर्दी आणि खोकला दूर होतो. तोंडातील फोड घालवण्यासाठी दोन चमचे आवळा ज्यूस पाण्यात मिसळून त्याने गुळण्या करा.

5 मजबूत केसांसाठी
आवळ्यातील अमीनो अ‍ॅसिड आणि प्रोटीनमुळे केस वाढतात, गळती थांबते आणि मजबूत होतात.

6 त्वचेवरील डाग
आवळा रसात कापूस भिजवून चेहर्‍यावर लावल्याने त्वचेवरील डाग दूर होऊन चमक वाढते.

7 न्यूट्रिशन ड्रिंक
आवळ्यात व्हिटॅमिन-सी तसेच आर्यन, कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्याने हे एक न्यूट्रिशन ड्रिंकप्रमाणे पिता येते.