घरच्या घरी बनवा इम्युनिटी बूस्टर आवळा मुरब्बा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आवळा हे व्हिटॅमिन सी समृद्ध आहे. आवळा हे प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत करते. चवीला आंबट असल्याने बरेच लोक ते खाण्यास संकोच करतात. अशा परिस्थितीत आपण ते मुरब्बा बनवून खाऊ शकता. आंबट आणि गोड असल्यामुळे मुलेही ते सहज खाऊ शकतात. जाणून घेऊया हे बनवण्याची रेसिपी …

साहित्य :

आवळा – १ किमी ग्रॅम
साखर – १, १/२ किलो ग्रॅम
तुरटी – २चमचे
लिंबाचा रस – १ चमचा
विलायची पावडर – १ चमचा
पाणी – ६ कप

कृती

१) सर्व प्रथम, एका भांड्यात पाणी आणि १/२ चमचे लिंबू रस आणि तुरटी मिसळा.
२) नंतर आवळे चांगले धुऊन त्यांना फोर्कच्या मदतीने छिद्र करून त्यांना रात्रभर पाण्यात भिजवा.
३) सकाळी आवळे स्वच्छ करून कोरडे करून घ्या.
४) एका भांड्यात पाणी उकळवा आणि त्यात आवळे मऊ होईपर्यंत उकळा.
५) आता एका वेगळ्या भांड्यामध्ये साखर, लिंबाचा रस, ६ कप पाणी घालून ते वितळवा.
६) साखरेचा पाक तयार झाल्यावर कढईत आवळा घाला आणि ४ ते ५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
७) थंड झाल्यावर विलायची पावडर घालून एअर टाइट कंटेनरमध्ये भरा.
८) अशा पद्धतीने आवळ्याचा मुरब्बा तयार आहे.