परवानाधारक शस्त्र विक्रेत्याच्या घरात सापडल्या अनधिकृत ५५ बंदूका

सातारा :  पोलीसनामा ऑनलाईन – सातारा जिल्ह्यातील पाटण येथील मोरे गल्लीत पाटण पोलिसांनी अनधिकृत शस्त्रसाठा जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी छापा मारून ५५ बंदूकांचा साठा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी प्रकाश शंकर यादव (रा. पाटण) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून ते परवानाधारक शस्त्र विक्रेते आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटण येथे प्रकाश शंकर यादव यांचा परवाना असलेले बंदूक विक्री-दुरुस्तीचे दुकान आहे. उपअधीक्षक जाधवर यांनी यादव यांच्या दुकानाला भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत यादवने आपल्या घरात अनधिकृतपणे शस्त्रसाठा करून ठेवल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून ५५ बंदुका जप्त केल्या आहेत. या प्रकरणी प्रकाश शंकर यादव (रा. पाटण) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.