2 कोटींच्या खंडणी प्रकरणात आणखी एकाला अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध व्यवसायिकास रास्ता पेठेतील जागा आणि 2 कोटींची खडणी मागितल्याप्रकरणात पुणे पोलिसांनी अमोल सतीश चव्हाण (वय 37) याला अटक केली. त्याला न्यायालयाने 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात सुधीर कर्नाटकी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बराटे, एक महिला व अमोल चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रथम महिलेसह तिघांना अटक केली होती. महिलेस या गुन्ह्यात जामीन मिळाला. तर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्या दोघांना दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली होती.

दरम्यान आरटीआय कार्यकर्ता आणि अमोल चव्हाण हे फरार होते. त्यांचा शोध घेतला जात होता. त्यात अमोल चव्हाण याला पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याचे वतीने वकील विजयसिंह ठोंबरे, ऍड रूपाली पाटील व ऍड हितेश सोनार यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी हा गुन्हा खोटा आहे. केवळ पीडित महिलेला न्यायालयीन कामकाजासाठी सहाय्य केले म्हणून आरोपीस या गुन्ह्यात गुंतविण्यात आल्याचा युक्तिवाद ठोंबरे यानी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अमोल चव्हाण याला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.