पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी अमोल काळे सीबीआयच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील प्रमुख आरोपी अमोल काळेचा केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने बुधवारी बंगळूर येथील तुरुंगातून ताबा घेतला. तो डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडातीलही मास्टरमाइड असावा, असा सीबीआयच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. आज काळेला पुण्यातील न्यायालयात हजर केले जाणार आहे.

[amazon_link asins=’B0756Z53JN,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’af3a5c3f-b18e-11e8-813d-cb33a7177170′]

काळे आणि डॉ. दाभोलकर हत्याकांडातील संशयित सचिन अंदुरे यांची औरंगाबादमध्ये भेट झाली होती. त्या वेळी काळे तेथील लॉजवर राहिला होता. औरंगाबादमधील वास्तव्यादरम्यान काळे याने अंदुरेला एक पिस्तूल दिले होते. दरम्यान, काळेने अंदुरेकडे दिलेल्या पिस्तुलाबाबतचा अहवाल अजूनही प्रलंबित असून त्यासंबंधीचा वेगळा गुन्हा औरंगाबाद येथे दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात

डॉ. दाभोलकर हत्याकांडातील संशयित शरद कळसकर तसेच राजेश बांगेरा आणि अमित दिगवेकर यांना १० सप्टेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली आहे. मात्र, सचिन अंदुरे याला न्यायालयीन कोठडी मिळाली. या तिघांची समोरासमोर चौकशी करण्याबरोबरच अंदुरेची चौकशी करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी सीबीआय करण्याची शक्यता आहे.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : कळसकर याला १० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी