Amol Kolhe-Ajit Pawar | अजित पवारांसोबतचा ‘तो’ फोटो घेणाऱ्या युवा फोटोग्राफरचं कोल्हेंनी केलं खास कौतुक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amol Kolhe-Ajit Pawar | शिरूरमधील (Shirur) राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांनी एका युवा फोटोग्राफरचं कौतुक केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबतचा एक फोटो शिवराज माने (Shivraj Mane) या फोटोग्राफरने अमोल कोल्हे यांना फोटोफ्रेम (Photo Frame) दिली. याबाबत कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट आणि ट्विटही करत माहिती दिली आहे. (Amol Kolhe-Ajit Pawar)

 

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2019) तोंडावर राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा (Shivswarajya Yatra) राज्यभर काढली होती.
त्यावेळी जिंतूरमध्ये (Jintur) अजित पवार आणि अमोल कोल्हे हे एकाच मंचावर होते.
दोघे एकत्र असताना कोल्हे आणि पवारांमध्ये काही संवाद चालू होता. त्यावेळी शिवराज मानेने हा फोटो टिपला होता.
हा फोटो अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यातील जवळीकता दाखवताना अनेकवेळा माध्यमांनी वापरलेला पाहायला मिळाला. (Amol Kolhe-Ajit Pawar)

 

शिवराज माने याने पुण्यात (Pune) भेट घेऊन खासदार अमोल कोल्हेंना या फोटोची फ्रेम दिली.
त्यानंतर यावर बोलताना, ही खूपच अविस्मरणीय भेट असल्याचं अमोल कोल्हे म्हणाले.
त्यासोबतच कोल्हे यांनी या फोचोग्राफरचं कौतुकही केलं आहे.

 

बीड (Beed) शहरातील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या शिवराजने आपल्या लहानपणापासूनच आई – वडिलांचा जगण्यासाठीचा संघर्ष बघितला आणि नुसता बघितलाच नाही तर त्यावर गांभीर्याने विचार करत आपली वाटचाल सुरु केली.
या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी त्याने फोटोग्राफीची निवड केली आणि त्यात स्वत:ला झोकून दिले.
आपले कौशल्य, कामातील प्रामाणिकपणा व गुणवत्ता या जोरावर त्याने खूप कमी वयात राज्यभर निर्माण केलेला नावलौकिक कौतुकास्पद असल्याचं कोल्हेंनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं.

 

Web Title :- Amol Kolhe-Ajit Pawar | NCP MP Dr. amol kolhe clap your hands mp amol kolhe compliments the photographer who took that hilarious photo with ajit pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा