शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडून मोठी घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी येत्या १८ तारखेला महत्वाची घोषणा करणार असल्याची पोस्ट आपल्या सोशल मीडियावर टाकली होती किल्ले शिवनेरीवर शिवसृष्टी व रोपवे, वढू तुळापूर येथे ऐतिहासिक वारसास्थळ शंभुसृष्टी निर्मिती करण्याच्या मागणीला केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे कोल्हे यांच्या मागणीला आता यश मिळाले आहे.

अमोल कोल्हे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टीची निर्मती सह रोप-वे निर्मिती करण्यात यावी, तसेच वढू तुळापूर या ठिकाणी शंभूसृष्टी उभारण्यात यावी अशी आग्रही मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना पर्यटन व सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी लेखी पत्राद्वारे लवकरच या निर्मितीसाठी केंद्रीय समितीमार्फत सर्व्हे केला जाईल, पॉलिसीनुसार त्यांनतर पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल, असे अमोल कोल्हेंनी सांगितले.

लोकसभेच्या प्रचारादरम्यान अमोल कोल्हे यांनी शिवनेरीच्या पायथ्याशी शिवसृष्टी निर्मितीचे आश्वासन दिले होते तसेच वढू तुळापूर या क्षेत्रांना ऐतिहासिक पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला जाईल असे देखील सांगितले होते. त्यामुळे कोल्हे यांनी जनतेला दिलेले वचन पूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अमोल कोल्हे यांनी शिवनेरीच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारून या ठिकाणाला ऐतिहासिक प्रेरणास्थळ बनवण्याचा प्रयत्न करत असून यासंबंधी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली होती. त्यानंतर फेसबुवरून मोठी घोषणा अशी पोस्ट केली होती. त्यामुळे अनेकांचे लक्ष अमोल कोल्हे नेमके काय घोषणा करणार याकडे लागले होते. अखेर शिवसृष्टीला हिरवा कंदील मिळाल्याची घोषणा झाली.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/