पुणे : Amol Kolhe At Bhau Rangari Ganpati | राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. विशेषत: मुंबई आणि पुण्यामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतो. त्यामुळे या शहरात गर्दी होत असते. अनेकजण बाप्पाच्या दर्शनासाठी याठिकाणी येत असतात. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati)
दरम्यान श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या दर्शनासाठी आज (दि.११) खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे (Sanjeev Javale) यांच्याकडून कोल्हे यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान खासदार कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, यंदा गणेशोत्सवाचं १३३ वं वर्ष असून सार्वजनिक गणेशोत्सवाची पायाभरणी असल्याने या मंडळाला मनःपूर्वक शुभेच्छा. बाप्पाकडे हेच मागणे आहे की महिलांच्या असुरक्षितेवरचे विघ्न जे भ्रष्टाचाराचे विघ्न आहे ते दूर होऊ दे आणि स्वाभिमानाचे राज्य या महाराष्ट्रात येऊ दे, अशी मागणी बाप्पाकडे केल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले. (Amol Kolhe At Bhau Rangari Ganpati)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा