Amol Kolhe | ‘कांदाप्रश्न, शिरूरमधील थ्री फेज लाईट आणि बिबट्याच्या प्रश्नावर कोणीच बोलत नाहीत’ – अमोल कोल्हे

ओतूर : Amol Kolhe | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) पक्षाचे शिरूर लोकसभा मतदार (Shirur Lok Sabha Election 2024) संघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा सध्या मतदारसंघात प्रचाराचा झंझावात सुरूआहे. गावभेटी, कोपरा सभांचा सपाटा कोल्हे यांनी लावला आहे. आज त्यांनी जुन्नर तालुक्यातील डिंगोरे पिंपळगाव जोगा जिल्हा परिषद गटात गावभेटी घेतल्या, यावेळी उदापूर येथे आयोजित कोपरा सभेत कोल्हे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, कांद्याचा प्रश्न असेल, बिबट्याचा प्रश्न असेल, हे प्रश्न शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने संसदेत मांडत आहे. दिल्लीचे सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडण्याचे काम करत आहे. शिवसेनेते काय झाले, राष्ट्रवादीत काय झाले हे आपण पहात आहोत. (Amol Kolhe)

शिरूरचे प्रश्न मांडताना अमोल कोल्हे म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री तिकीट वाटपासाठी दहा वेळा दिल्लीला जातात. मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला जात नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मंत्री शिरूरमध्ये येतात पण आम्हाला दिवसा थ्री फेज लाईट द्या या मागणीवर काही बोलत नाही. बिबट्याच्या प्रश्नाविषयी कुणी ठोस भुमिका घेत नाही, अशी तक्रार कोल्हे यांनी केली.

या कोपरा सभेला आमदार बाळासाहेब दांगट, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपजिल्हाप्रमुख अनंतराव चौगुले,
तालुकाध्यक्ष तुषार थोरात, माजी जि.प. सदस्य शरद लेंडे, अंकुश आमले, मोहित ढमाले, माजी सभापती बाजीराव ढोले,
शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक संभाजी तांबे, शरद चौधरी, सुनिल मेहेर, राहुल सुकाळे, ज्योसना महाबरे,
चैताली केंगले, उदापूर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव कुलवडे, सरपंच सचिन आंबडेकर,
विद्याविकास विकास मंडळ अध्यक्ष प्रभाकर शिंदे, पाडुरंग शिंदे, रोहिदास शिंदे, प्रकाश कुलवडे,
संजय शिंदे, संजय बुगदे, संतोष होनराव, पुष्पलता शिंदे, प्रमिला शिंदे, उदापूर ग्रामपंचायत सदस्य व नागरीक उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

Pune Water Crisis-Traffic Issue | आम्हाला प्यायला पाणी आणि कोंडीमुक्त रस्ते कसे देणार? लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पुण्याच्या पाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न अतिगंभीरतेच्या दिशेने

Pimpri Murder Case | पिंपरी : मित्राचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक