थोर महापुरुषांच्या यादीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करावा : खा. डॉ. अमोल कोल्हे

पोलिसनामा ऑनलाईन – छत्रपती संभाजी महाराजांच्या 359 व्या जयंती 14 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्यांचे नाव थोर महापुरुषांची दिनविशेष यादीत नसल्याबद्दल खासदार अमोल कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटवरुन त्यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर राज्य सरकाने यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख राज्य सरकारच्या महापुरुषांशी संबंधित दिनविशेष यादीत नसल्याचे त्यांनी सरकारच्या निर्दर्शनास आणून दिले. महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचे योगदान न विसरण्याजोगे आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. मुख्यमंत्री कार्यालय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करत, विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत कोल्हे यांनी संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती. यापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका देखील साकारली होती.