Amol Kolhe | मी, माझं, माझ्यासाठी हा वैयक्तिक अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन मी निवडणूक लढवत नाही – डॉ. अमोल कोल्हे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – Amol Kolhe | ही निवडणूक देशाच्या जनतेला काय वाटत, शेतमालाला हमी मिळणार का? महागाई कमी होणार का? तरुणांना रोजगार मिळणार का. ? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आहे. कोणाला काय वाटत याची नाही. आणि म्हणूनच मी, माझं, माझ्यासाठी हा वैयक्तिक अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन मी निवडणूक लढवत नाही, असं खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणालेत.(Amol Kolhe)

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज भोसरी विधानसभेच्या (Bhosari Vidhan Sabha) दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी ही माजी शेवटची निवडणूक आहे,
असं म्हणत मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. यावर माध्यमांनी डॉ. कोल्हे यांनी विचारणा केली असता
डॉ. कोल्हे म्हणाले की, ही लोकसभेची निवडणूक आहे. कोणाची पहिली निवडणूक की शेवटची याची नाही.
त्यामुळे आढळराव पाटील यांच्या वयाचा मान ठेवत मी त्यांना एवढंच सांगेल की आपण देशाचं बोलूयात, देशाचं,
जनेतेच बोलूयात. त्यांना काय वाटत मला काय वाटत यापेक्षा जनतेला काय वाटत हे महत्वाचं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election In Maharashtra | यंदाच्या निवडणुकीत कोकणातून ‘धनुष्यबाण’ तर साताऱ्यातून ‘घड्याळ’ हद्दपार, जाणून घ्या या निवडणूकीतील 10 मोठ्या राजकीय घटना

Baramati Lok Sabha Election 2024 | अजितदादांचा डमी अर्ज नामंजूर, बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजयी अशीच लढत