शिवसेनेला टक्‍कर देण्यासाठी खा.अमोल कोल्हेंनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी दिवाळीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येतील,अशी चर्चा सुरु असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे  यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना विधान आले आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अप्रत्यक्षपणे आघाडीला पाठिंबा दिल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आता  अमोल कोल्हे त्यांची भेट घेतल्याने या चर्चेने जोर धरला आहे. दरम्यान या भेटीवर प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे यांनी हि फक्त सदिच्छा भेट घेतल्याचे सांगितले.

शिरूरमधून जोरदार लढत 

शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांनी तीन वेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या आढळराव पाटील यांचा पराभव केला. शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कोल्हे यांनी या ठिकाणी आढळराव पाटलांना चांगलीच टक्कर दिली होती. डॉ. अमोल कोल्हे हे ५८४८३ मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादीचं संघटन आणि स्वत:ची प्रतिमा यासोबत अमोल कोल्हे जिंकून येण्यामागे इतरही अनेक कारणं आहेत.संभाजी महारांजांच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेल्या अमोल कोल्हे यांनी आपल्या या मतदारसंघातून विजय मिळवत आढळराव पाटील यांच्या चौकार मारण्याच्या स्वप्नाला सुरुंग लावला होता.

कॅन्सरच्या मोठ्या सामन्यानंतर सोनाली घेतेय आता हा ‘उपचार’

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य