Amol Kolhe | राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे गृहमंत्री अमित शहांना भेटले, राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण

पुणे : Amol Kolhe | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) हे काही दिवसांपूर्वी भाजपाचे (BJP) वरिष्ठ नेते अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले होते. यानंतर खडसे पुन्हा भाजपामध्ये जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, खडसे यांनीच यावर नंतर स्पष्टीकरण दिले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे (Shirur Lok Sabha Constituency) खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

5 ऑक्टोबरला अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा ’शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपट (Shivpratap Garudzep Movie) प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने अमोल कोल्हे यांनी शहांची दिल्लीत भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र या भेटीने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. डॉ. कोल्हे हे संसदेत सरकारच्या विरोधी ठोस भूमिका मांडत असतात. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा सभागृहात बोलत असतात.

 

दरम्यान, भाजपाने शिरुर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी आतापासूनच भाजपाच्या केंद्रीय मंत्री रेणुका सिंग (Union Minister Renuka Singh) शिरुरमध्ये तयारीला लागल्या आहेत. त्यांच्याकडे शिरूरच्या जागेची जबाबदारी देण्यात आली आहे. अशा स्थितीत कोल्हे यांनी शहांची घेतलेली भेट महत्वाची ठरत आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या स्नूषा भाजपा खासदार रक्षा खडसे
(MP Raksha Khadse) यांच्यासह दिल्लीला अमित शहांच्या भेटीला गेले होते.
परंतु शहांची भेट होऊ न शकल्याने खडसे आणि अमित शहांचे फोनवरून बोलणे झाले होते.
यानंतर खडसे हे पुन्हा भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली होती.
मात्र, एकनाथ खडसेंनी स्वता या भेटीचे स्पष्टीकरण दिले होते.

Web Title :- Amol Kolhe | ncp mp amol kolhe meet amit shah in delhi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | शाळेतील मुलाचा लैंगिक छळ करणाऱ्या माजी मुख्याध्यापकासह दोन धर्मगुरुंवर FIR

Maharashtra Politics | पेंग्विनने खुप प्रसिद्धी दिली…तुम्ही पेंग्विन सेना बोलत रहा, आदित्य ठाकरेंचा शिंदे गट आणि भाजपाला टोला