Amol Kolhe | राज्यपालांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणं गरजेचं होतं, अजित पवारांनी ते काम केलं – अमोल कोल्हे

0
169
Ajit Pawar On Bhagat Singh Koshyari bhagat singh koshyari controversial statement over marathi mumbai ncp leader ajit pawar slammed with tweet
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Amol Kolhe | आजकाल राजकारणात मोठ्या महत्त्वाच्या पदावर बसणाऱ्या व्यक्तींकडून चुकीची वक्तव्य होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे याकडे मी लक्ष वेधतो. महान लोकांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. कोणाबद्दल आकस, आसूया न ठेवता महापुरुषांविषयी अनावश्यक वक्तव्य करु नये, असा टोला नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना लगावला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अजित पवार यांचे ट्विटद्वारे कौतुक केले आहे.

 

पुणे मेट्रोचे (Pune Metro) उद्घाटन (Inauguration) आणि विकासकामांच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले होते. यावेळी कोथरुडमध्ये (Kothrud) जाहीर सभा झाली त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी भरसभेत राज्यपालांचे नाव न घेता टोला लगावला. अजित पवारांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)  यांनी ट्विटद्वारे त्यांची स्तुती केली आहे.

 

महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (Krantijyoti Savitribai Phule) यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम आज अजितदादांनी केले. हे गरजेचे होते व ते फक्त अजित पवारच करु शकतात, असं अमोल कोल्हे यांनी सांगितले.

काय म्हणाले अजित पवार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आज पुण्यातील कार्यक्रमात बोलताना राज्यपालांच्या विधानावर अप्रत्यक्ष शब्दांत नाराजी व्यक्त करताना थेट पंतप्रधानांकडेच तक्रार केली. पंतप्रधानांच्या लक्षात मी एक बाब आणू इच्छितो. अलिकडे महत्त्वाच्या पदांवरील सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला न पटणारी आहेत. मनात कुणाच्याही बद्दल आसूया न ठेवता विकासकामात राजकारण न करता हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे, हे मी नम्रतापूर्वक सांगतो, असे अजित पवार म्हणाले.

 

 

Web Title :- Amol Kolhe | NCP MP Dr. Amol Kolhe On Ajit Pawar Speech In Front Of PM Narendra Modi Governor bhagat Singh koshyari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

AAP On PM Modi Visit To Pune | ‘आम आदमी’ची गांधीगिरी ! मोदीजी, तुम्ही नेहमीच पुण्यात या, त्या निमित्ताने रस्ते सुधारतील इथले’

 

Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या पाचशेच्या आत, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Sharad Pawar | ‘त्या’ वक्तव्यावरुन शरद पवारांचा राज्यपालांना खोचक टोला, म्हणाले – ‘कधीकधी पदावर बसलेल्या…’