Amol Kolhe On Ajit Pawar | पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणून कोणी साहेब होत नाही; अमोल कोल्हेंनी अजित पवारांना लगावला टोला

Kolhe Amol-Pawar Ajit

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Amol Kolhe On Ajit Pawar | राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना टोला लगावत म्हटंले आहे की, “फक्त पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणून कोणी साहेब होत नाही. महाराष्ट्रात साहेब दोनच आहेत. एक शरदचंद्रजी पवार साहेब आणि दुसरे हिंदु ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे. या दोघांनाच आमची पीढी तरी साहेब मानते.”

खेड आळंदी (Khed Alandi Assembly) येथील आमदार दिलीप मोहित पाटील (Dilip Mohite Patil) यांच्या जनसंवाद दौऱ्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, “जर खेड आळंदीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर पक्षाचे आमदार मोहिते पाटील यांना निवडून द्या. खेड आळंदीला दिव्याची गाडी देतो. आता आपल्याला कोणला सांगायची गरज नाही. आता आपणच साहेब आहोत.”

अजित पवार यांच्या या वक्तव्याचा खासदार कोल्हे यांनी खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले की, “फक्त एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणं म्हणजे साहेब होणे नसतं.
त्यासाठीचा सांस्कृतिक व्यासंग असेल, सामाजिक व्यासंग असेल, दुसर्याच्या जीवावर नाही तर स्वत:च्या कर्तुत्वावर उभं राहणं असेल किंवा संकट आल्यानंतर पळून न जाता संकटांना छातीवर झेलणं म्हणजे पवार साहेब असणं आहे. आणि हे माझ्या सारख्या लहान कार्यकर्त्याने अजित दादांना सांगण्याची गरज नाही.” (Amol Kolhe On Ajit Pawar)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule On Vidhan Sabha | “लोकसभेला याचा अंदाजच घेतला नव्हता मात्र आता विधानसभेला…”, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान म्हणाले,…

BJP Strategy for Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | विधानसभा जिंकण्यासाठी भाजपची सहा नेत्यांवर विशेष जबाबदारी; निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली

Murlidhar Mohol | भारत होणार नागरी हवाई वाहतुकीची सर्वात मोठी बाजारपेठ; केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा दावा

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)